कुडाळ शिबिरात ५० जणांचे रक्तदान

कुडाळ शिबिरात ५० जणांचे रक्तदान

Published on

swt16.jpg
74388
कुडाळ ः रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविताना नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर. बाजूला संजय पडते, अमित सामंत, दादा साईल, ओंकार तेली आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळ शिबिरात ५० जणांचे रक्तदान
८० लाभार्थ्यांची चिकित्सा ः बाजारपेठ मित्रमंडळाच्या उपक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः (कै.) देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्रमंडळ कुडाळच्या वतीने येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. मोफत आरोग्य तपासणी, रक्त व मधुमेह तपासणीचाही नागरिकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीप्ती पडते, राजन नाईक, दीपक नारकर, ओंकार तेली, मंदार शिरसाट, भाग्यलक्ष्मी पडते, द्वारकानाथ घुर्ये, गणेश भोगटे, विलास कुडाळकर, संजय भोगटे, श्रीराम शिरसाट, चेतन पडते, प्रथमेश पडते, चेतन धुरी, शार्दूल घुर्ये, अनिकेत नेवाळकर, स्वरुप वाळके, संदेश पडते, प्रसाद शिरसाट, नितीश महाडेश्वर, राकेश कांदे, ऋषिकेश शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोलते, अधिपरिचारिका बागेवाडी व रेडकर, अनिल खाडे, अस्लम शेख आदी उपस्थित होते.
शिबिराचे औचित्य साधून आंबेडकरनगर अंगणवाडीतील मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. शिबिरात ३० जणांनी रक्ततपासणीचा व ५० हून अधिक नागरिकांनी मधुमेह व रक्तदाब, कोलेस्ट्रॉल तपासणीचा लाभ घेतला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com