प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या निवडीने सावंतवाडीत भाजपकडून जल्लोष

प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या निवडीने सावंतवाडीत भाजपकडून जल्लोष

Published on

swt119.jpg
74524
सावंतवाडीः भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या निवडीने
सावंतवाडीत भाजपकडून जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः भाजप नेते, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सावंतवाडी भाजपकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी घोषणा देत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोकणचे सुपुत्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने कोकणात भाजप आणखी बळकट होईल, असा विश्वास सावंतवाडी खरेदी-विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे यांनी व्यक्त केला.
माजी तालुकाध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी, संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव होत असून सावंतवाडी तालुक्यातील भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे, असे सांगितले. यावेळी फटाके फोडून, घोषणा देत जल्लोष करण्यात आला. जिल्हा बँक संचालक मडगावकर, जिल्हा चिटणीस महेश धुरी, सावंतवाडी खरेदी-विक्री संघ चेअरमन गावडे, माजी नगरसेवक गुरू मठकर, शहर उपाध्यक्ष सुकन्या टोपले, शहर उपाध्यक्ष ज्योती मुद्राळे, शहर सरचिटणीस मेघना साळगावकर, माजी शहराध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर, दशरथ मांजरेकर, दत्ताराम कोळमेकर, उल्हास परब, गणेशप्रसाद पेडणेकर, संजय शिरसाट, राजन राणे, ज्ञानदीप राऊळ, कुणाल श्रृंगारे, अमित गौंडळकर, नागेश जगताप, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, योगेश गवळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com