जिल्ह्यात ११,७४१  मेट्रिक टन खत उपलब्ध

जिल्ह्यात ११,७४१ मेट्रिक टन खत उपलब्ध

Published on

जिल्ह्यात ११ हजार ७४१ टन खत उपलब्ध
डॉ. शिवकुमार सदाफुले ः बफर स्टॉकमधील ८३ टक्के साठी विक्रिसाठी खुला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः कृषि विभागाकडून जिल्ह्याला मंजूर असलेल्या खतापैकी ११ हजार ७४१ मेट्रिक टन एवढे खत उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत १ हजार ५३७ पैकी ८१४ गावांमध्ये शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप करण्याची आल्याची माहिती जिल्हा कृषि अधीक्षक डॉ. शिवकुमार सदाफुले यांनी दिली.
जिल्ह्यासाठी २०२५-२६ खरीप हंगामाकरीता एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी युरिया, डीएपी, संयुक्त खते, एसएसपीचे १२ हजार ९०८ मेट्रीक टन खत मंजूर आहे. त्यापैकी ६ हजार ९८४ मे. टन युरिया जिल्ह्याला मंजूर आहे. मागील तीन महिन्यात म्हणजेच एप्रिल ते जून या कालवधीत जिल्ह्यात ११ हजार ७४१ मे. टन एवढे खत उपलब्ध झाले आहे. तसेच ७ हजार २३७ मे. टन युरियाही उपलब्ध झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मागील तीन वर्षांमध्ये खतांचा सरासरी वापर १२ हजार २९७ मे.टन एवढा आहे. सद्यःस्थितीत मंजूर खत आणि उपलब्ध खते यांची तुलना केली असता जिल्ह्यात ९० टक्के खते उपलब्ध झालेले आहे. इथून पुढे भात पिकाकरिता व फळझाडांच्या खते भरणी करता आवश्यक असलेली आणखी खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. तसेच वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून भात पिकासाठी युरिया खत मिळावे यासाठी जिल्ह्यातील ५०० मे. टन बफर स्टॉक मधील ४१६ मे. टन युरियाचा साठा ८३ टक्के खत विक्रिसाठी खुले करून देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १ हजार ५३७ गावांपैकी ८१४ गावांमध्ये ४४९ गटांमार्फत बांधावर खते किंवा निविष्ठांचे वितरण करण्यात आले असून सामुहिक खरेदीमुळे आर्थिक बचतीसह वेळेची देखील बचत झाली आहे.
---
संगेमश्वर, चिपळुणात खतांची टंचाई
संगमेश्वर, चिपळूण या दोन तालुक्यात खतांची टंचाई मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाकरे शिवसैनिकांनीही यावरुन कृषि विभागाला लक्ष्य केले होते. जिल्हा कृषि विभागाकडून आतापर्यंत चिपळुणात ११७६ मे. टन तर संगमेश्वरमध्ये ८५४ मे. टन खत पूरवठा केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे दोन्ही तालुक्यांना खत पुरवठा केलेला असतानाही शेतकऱ्यांकडून ओरड होत असल्याने तालुक्याला प्राप्त खत झिरपले कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
---
- तालुकानिहाय खतांचा पुरवठा (मेट्रिक टन) ः

तालुका* युरिया* सुफला* एकूण खत (युरिया+सुफला)
दापोली* ५७५.५५* २८५.५* ८६१.०५
मंडणगड* ४०.५* १२२* १६२.५
खेड* ४५४.१४* ८४* ५३८.१४
गुहागर* २८८.७६* ३०१.८* ५९०.५६
चिपळूण* १०१४.०७*१६२* ११७६.०७
संगमेश्वर* ७०४.७*१४९.५* ८५४.२
रत्नागिरी* ११६२.८४* ४७८.५*१६४१.३४
लांजा* ६०७.२४* २१६.५* ८२३.७४
राजापूर* ६७४.९९* २७८* ९५२.९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com