-जिल्ह्यातील ३ लाख ३ हजार रेशनकार्ड होणार रद्द
जिल्ह्यातील ३ लाख रेशनकार्ड होणार रद्द
रोहिणी रजपूत ः आवाहनानंतरही ई-केवायसी अपूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : ई-केवायसी पूर्ण नसलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३ हजार ४५४ रेशन कार्ड रद्द होण्याची टांगती तलवार आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा पुरवठा विभागाने वारंवार आवाहन करूनही त्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. ११ जुलैपर्यंत त्यासाठी मुदत असून त्यानंतर शासन स्तरावरूनच ही कार्ड रद्द होणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.
ई-केवायसी हा रेशन कार्ड अंतर्गत लाभ देण्यासाठी एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळण्याचा एक डीजिटल मार्ग आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह आधार प्रमाणीकरण वापरून रेशन कार्डसाठी ई-केवायसी पूर्ण केली जाते. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार-आधारित ओटीपी किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रदान करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर, यूआयडीएआय आधार कार्डचा मुलभूत लोकसंख्याशास्त्रीय डेटा, जसे की, नाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग आणि छायाचित्र, राज्य अन्न आणि नागरी पुरवठा विभागांना प्रमाणीकरणासाठी दिला जातो. राज्यांमधील नियुक्त अधिकारी रेशनकार्डधारकांची ओळख सत्यापित करण्यासाठी आणि निश्चित करण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) डेटाबेसमधील माहितीसह ई-केवायसीद्वारे प्राप्त झालेल्या डेटाची तुलना केली जाते. रेशन कार्ड ई-केवायसी हे सुनिश्चित करेल की आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडलेले आहे आणि ते एकाच व्यक्तीचे आहेत. आधार रेशन कार्ड लिंकिंगची पडताळणी केल्याने फसवणूक दूर होण्यास आणि अन्न, धान्य वितरणात पारदर्शकता राखण्यास मदत होते. त्यासाठी शासनाने हे अनिवार्य केले आहे.
जिल्ह्यात ई-केवायसीसंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. परंतु त्याकडे कार्डधारक गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कार्डधारकांवर कार्ड रद्द होण्याची टांगती तलवार आहे. यामध्ये ३४ हजार ९०४ अंत्योदय अन्नधान्य कार्डधारक आणि २ लाख ६८ हजार ५४७ प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांचा समावेश आहे. यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. ११ जुलैपर्यंत ती पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील ही ३ लाख ३ हजार रेशन कार्ड शासन स्तरावरच रद्द होण्याची शक्यता आहे.
-----
तालुकानिहाय ई-केवायसी अपूर्ण असलेली कार्ड
मंडणगड* १२६५२
दापोली* ३४३५१
खेड* ३०११८
गुहागर* १९४५५
चिपळूण* ४९५३७
संगमेश्वर* ४३२८६
रत्नागिरी* ५९६९८
लांजा* १६६१६
राजापूर* ३७६७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.