पक्षसंघटना बळकटीसाठी कटीबद्ध रहा
पक्ष बळकटीसाठी कटीबद्ध रहा
खासदार तटकरे ः राष्ट्रवादीचा खेडमध्ये मेळावा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा खेड येथे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पक्षवाढ, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती, नवीन कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात विस्तृत चर्चा झाली.
या वेळी प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, सरचिटणीस जयेंद्र खताते, साधना बोत्रे, संदीप राजपुरे, अजय बिरवटकर, स. तु. कदम, संजय जाधव आदी उपस्थित होते. मेळाव्यात असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये प्रकाश शिगवण- जिल्हा उपाध्यक्ष, संजना बुरटे- खेड महिला कार्याध्यक्ष, अनिल सदरे- शहराध्यक्ष, रजनीकांत धोत्रे यांचा समावेश आहे. बैठकीत शौकत मुकादम यांनी आपले परखड विचार मांडत संघटनेच्या भक्कम उभारणीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.