ःरस्ता खचला, बाजूपट्टीला पडल्या मोठमोठ्या चरी

ःरस्ता खचला, बाजूपट्टीला पडल्या मोठमोठ्या चरी

Published on

- rat२p११.jpg, rat२p१२.jpg-
२५N७४७१९
संगमेश्वर ः तालुक्यातील तुरळ-आंबवपोंक्षे ते आरवली रस्त्याच्या बाजूपट्ट्यांची पहिल्याच पावसात झालेली दुरवस्था.

रस्ता खचला, बाजूपट्टीला मोठ्या चरी
तुरळ-आंबवपोंक्षे ते आरवली रस्ता; भायजे यांची कामाच्या चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ ः प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून संगमेश्वर तालुक्यात तुरळ-माखजन-सरंद-आंबवपोक्षे ते आरवली हा ९.२३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ७ कोटी ४० लाख १५ हजार रुपये मंजूर करण्यात आले. हे काम असमाधानकारक असून, त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे यांनी केली आहे. संरक्षण भिंत नसल्यामुळे आंबवपोंक्षे ते अरवलीदरम्यान हा रस्ता पहिल्याच पावसात खचला आहे. अनेक ठिकाणी गटारं नसल्यामुळे रस्ताची बाजूपट्टी वाहून गेली असून मोठमोठ्या चरी पडल्या आहेत. यावरून रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आम्हाला शंका आहे, असा आक्षेप भायजे यांनी घेतला आहे.
तुरळ ते आरवली रस्त्याविषयी भायजे यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, पहिल्या पावसात रस्त्याची दुरवस्था झाली असून, डांबरीकरणावरून गाडी जरा बाहेर गेली तर उलटण्याची भीती आहे. घडशीवाडी स्मशानभूमी येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून एसटी बस वळवण्यासाठी ४० मीटर लांबी-रूंदीचे दुहेरी सोलिंग व खडीकरण करून रस्ता केला होता. त्याच ठिकाणी गेल्या वर्षी गरज नसताना मोरी टाकली गेली. त्या मोरीतून पाणी नाल्यात जाण्याऐवजी नाल्याचेच पाणी मोरीतून गटारात येत आहे. तेच पाणी वाडीतील लोकांच्या घरादारात शिरत आहे. त्यामुळे ती मोरी काढून टाका, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली होती; मात्र अद्यापही संबंधित ठेकेदाराने ती मोरी काढलेली नाही. कामाच्या अंदाजपत्रकात सरंद जाधववाडी येथे व आंबवपोंक्षे जुनी मराठी शाळा येथे दोन कॉजवेसाठी निधी मंजूर केला आहे. त्या कॉजवेऐवजी तिथे स्लॅब ड्रेन घ्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्या ठिकाणी मोठ्या पावसात पाणी आले असून, कॉजवेवरून ये-जा करणे ग्रामस्थांना गैरसोयीचे होत आहे. पहिल्याच पावसात नाल्यातील कचरा अडकल्याने पाणी बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. त्यात शेतीचे नुकसान झालेले आहे. या सर्व समस्या वेळीच सोडवणे गरजेचे आहे.

अंदाजपत्रकानुसार काम नाही
आंबवपोंक्षे ग्रामपंचायत कार्यालय ते आरवली या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेकडील डोंगरीविकास, स्थानिक विकास व जिल्हा नियोजनामधून प्राप्त ६० लाख रुपयांच्या निधीतून ३१ मे २०२३ ला पूर्ण झाले. यासाठी आमदार शेखर निकम यांनी प्रयत्न केले होते; परंतु पावसाळ्यानंतर त्याच रस्त्यावर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २०० मीटर डोंगराचा भाग वगळता अडीच किलोमीटर रस्त्यावर बीबीएम व कार्पेट करण्यात आले. त्या रस्त्याचे काम अंदाजपत्रकात दिल्यानुसार झालेले नाही. रस्त्यावर खडीचे तीनही थर टाकण्यात आलेले नाही. तसेच डांबरीकरणाचा सिलकोटही टाकलेला नाही, असे निरीक्षण भायजे यांनी नोंदवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com