कदम, ठाकरे, जाधव यांचा मळगाव हायस्कूलतर्फे सत्कार

कदम, ठाकरे, जाधव यांचा मळगाव हायस्कूलतर्फे सत्कार

Published on

swt220.jpg
74817
मळगाव ः शिवाजी ठाकरे, सुनील कदम, विलास जाधव यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक मारुती फाले व अन्य मान्यवर.

कदम, ठाकरे, जाधव यांचा
मळगाव हायस्कूलतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेचे पर्यवेक्षक सुनील कदम, सहाय्यक शिक्षक शिवाजी ठाकरे, प्रयोगशाळा परिचर विलास जाधव यांचा त्यांच्या कुटुंबियांसमवेत मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन प्रशालेच्यावतीने सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
मळगाव हायस्कूलचे शिक्षक ठाकरे हे १९ वर्षांच्या सेवेनंतर आपल्या नियत वयोमानानुसार ३० एप्रिलला, पर्यवेक्षक श्री. कदम हे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी तर प्रयोगशाळा परिचर श्री. जाधव ३१ वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सोमवारी (ता. ३०) सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने संस्था व प्रशालेच्यावतीने सर्वांच्या कार्याचा सेवागौरव समारंभ प्रशालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे सचिव आर. आर. राऊळ, खजिनदार मोहन मुळीक, संचालक बाळकृष्ण तेंडोलकर, संचालक रामचंद्र केळुसकर, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण, श्रद्धा सावंत, बाळकृष्ण मुळीक, माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष शेखर पाडगावकर, केंद्रप्रमुख शिवाजी गावित, शिक्षक विठ्ठल सावंत, ओमप्रकाश तिवरेकर, प्रज्ञा मातोंडकर, संदीप कारिवडेकर, नेहा गोसावी, आनंदी मोर्ये, बी. बी. साव़त, पी. व्ही. केसरकर, एस. एस. परुळकर, आर. आर. सावंत-भोसले, अभिजित गावडे, वैभव दगडखैर, रितेश राऊळ, ग्रंथपाल सतीश राऊळ, रमेश भांडे, दाजी राऊळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर तर, आभार प्रदर्शन विठ्ठल सावंत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com