उत्सवी नाट्य स्पर्धेचे ५ जुलैला बक्षिस वितरण
-rat२p४४.jpg-
२५N७४८१५
रमेश भाटकर
-------
‘उत्सवी नाट्य’चे शनिवारी बक्षीस वितरण
नाट्य परिषद ; रत्नागिरीत स्पर्धेचे प्रथमच आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे गेले सहा महिने सुरू असलेल्या नटश्रेष्ठ (कै.) रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्यस्पर्धेचे बक्षीस वितरण ५ जुलैला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पालकमंत्री उदय सामंत, निवृत्त न्यायाधीश (उच्च न्यायालय) मृदुल रमेश भाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे.
मंत्री सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा नोव्हेंबर २०२४ पासून मे २०२५ पर्यंत सुरू होतील. रत्नागिरीचे सुपुत्र अभिनेते रमेश भाटकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धक संस्थांनी कुठेही न जाता आपल्या उत्सवाच्या ठिकाणी नाटक सादर करायचे होते. एकदा नोंदणी झाली की, नाट्य परिषदेच्या माध्यमातून दोन परीक्षक नाटकाचे परीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहत होते. स्पर्धेत ४७ नाटकांनी सहभाग नोंदवला व उत्तमोत्तम नाट्यप्रयोग सादर केले. अमर तथा आप्पा रणभिसे, अनुया बाम, ॲड. रजनी सरदेसाई, पूर्वा खालगावकर, पौर्णिमा साठे, सुधाकर बेहरे, विजय पोकळे, नागेश बेर्डे, विनयराज उपरकर, ॲड. श्रीकांत भाटवडेकर, श्रीकांत पाटील, सनातन रेडिज, सुहास साळवी, पुरूषोत्तम केळकर, विनायक जोशी, चंद्रशेखर मुळ्ये, संतोष सनगरे, शैलेश चव्हाण आणि अमेय धोपटकर, वामन जोग यांनी परीक्षण केले. स्पर्धाप्रमुख म्हणून अमेय धोपटकर यांनी तर संतोष सनगरे यांनी नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.