सैनिक नागरी पतसंस्थेतर्फे  चंद्रशेखर जोशींचा सत्कार

सैनिक नागरी पतसंस्थेतर्फे चंद्रशेखर जोशींचा सत्कार

Published on

swt225.jpg
75067
सावंतवाडी ः सैनिक नागरी पतसंस्थेतर्फे चंद्रशेखर जोशींचा सत्कार करताना मान्यवर.

सैनिक नागरी पतसंस्थेतर्फे
चंद्रशेखर जोशींचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः माणगाव पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगावच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षण अग्रणी पॅनेलचे उमेदवार माजी सैनिक चंद्रशेखर जोशी हे प्रचंड मतांनी निवडून आले. त्यांच्या या यशाबद्दल सैनिक पतसंस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्था व शालेय विकासात त्यांनी भरीव कामगिरी करत गेल्या तीन वर्षांत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने अनेक उपक्रम राबविले आहेत. ते सैनिक पतसंस्थेचे विद्यमान संचालक म्हणून योगदान देत आहेत. तसेच इंडियन एक्स सर्व्हिसमेन लिग महाराष्ट्र डिस्टिक्ट सेंटर सिंधुदुर्ग या माजी सैनिकांच्या संस्थेच्या अध्यक्षपदी देखील त्यांची निवड करण्यात आली आहे. याचे औचित्य साधून सैनिक नागरी पतसंस्थेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरसाट, संचालक दीनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, संतोष मुसळे, शामसुंदर सावंत, बाबू वरक, शांताराम पवार, गोपाळ बाईत, तज्ज्ञ संचालक तातोबा गवस, पद्मनाभ परब, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com