वळिवंडे शाळेत कृषी दिनी वृक्ष लागवड जनजागृती

वळिवंडे शाळेत कृषी दिनी वृक्ष लागवड जनजागृती

Published on

swt231.jpg
74989
वळिवंडेः येथे कृषी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना रोपाचे वाटप करण्यात आले.

वळिवंडे शाळेत वृक्ष लागवड जनजागृती
देवगडः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पुढाकाराने फोंडाघाट येथील राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वळिवंडे शाळेत कृषी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी वृक्ष लागवड जनजागृती उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वळिवंडे क्र. १ येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणा देत शालेय विद्यार्थ्यांसह जनजागृती फेरी काढण्यात आली. शालेय परिसरात विविध फळझाडे व फुलझाडांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटपही करण्यात आले. मुख्याध्यापिका मालंडकर आणि सहाय्यक शिक्षकांचे सहकार्य लाभले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज संते, साईराम चव्हाण, अथर्व बगाडे उपस्थित होते. या उपक्रमात राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी अथर्व साळोखे, प्रतीक भोपळे, शुभम पोवार, प्रथमेश पाटील, आदित्य कोळेकर, निहाल पोफळे, गिरीश नाईक, अभी पाटील, गणेश भाकरे आणि प्रथमेश इंगळे आदी सहभागी झाले.
........................
swt232.jpg
74990
देवगड ः तालुक्यातील पुरळ हुर्शी येथे विद्यार्थी फेरी काढण्यात आली.

पुरळ हुर्शी शाळेमार्फत कृषी जनजागृती
देवगडः कृषी दिनानिमित्त डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि तालुक्यातील पुरळ हुर्शी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने हुर्शी गावात कृषी विषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख रस्त्यांवरून जनजागृती फेरी काढली. ‘शेती करा, शाश्वत शेतीचा स्वीकार करा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी फलक आणि कृषी विषयक संदेश घेऊन ग्रामस्थांमध्ये कृषीविषयी जागरुकता निर्माण केली. विकास देवळेकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केले. यानिमित्ताने कृषी विषयी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. नैसर्गिक शेती, शेतकर्‍यांचे जीवन आणि पीक विविधता यावर आधारित चित्रांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. या उपक्रमामुळे ग्रामस्तरावर कृषी विषयी सकारात्मक संदेश पोहोचविण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता निर्माण होण्यास मदत झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com