नाडकर्णी घेतील तो निर्णय मान्य
swt235.jpg
74894
दोडामार्गः कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते. (छायाचित्र ः संदेश देसाई)
नाडकर्णी घेतील तो निर्णय मान्य
समर्थकांची भूमिकाः दोडामार्ग येथील मेळाव्यात चर्चा
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २ : दोडामार्ग तालुक्याच्या विकासात तुमचे योगदान आहे. राजकीय विरोधक तुमचे योगदान मान्य करणार नाहीत, कारण त्यांना विकासापेक्षाही राजकारण महत्त्वाचे असते. तालुक्यातील प्रत्येक गावात तुम्हाला मानणारा कार्यकर्ता, ग्रामस्थ आहेत. कारण विकासाची प्रक्रिया तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. विरोधी पक्षात राहूनही जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. त्यामुळे आज सत्ताधारी पक्षाशी संबंधित असूनही राजकीय प्रक्रियेपासून दूर राहणे योग्य नाही. तुम्ही कोणताही निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत राहू, अशी भूमिका तालुक्यातील समर्थकांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्याकडे मांडली. श्री. नाडकर्णी गेला काही काळ राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज येथे आयोजित करण्यात आला.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप पक्षाच्या वरिष्ठांकडून भाजपचा एक प्रामाणिक कार्यकर्ता असलेल्या नाडकर्णी यांच्यावर पक्षाने कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे नाडकर्णींनी राजकीय काम थांबविले होते. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नाडकर्णी यांनी आपली राजकीय दिशा ठरवावी, यासाठी त्यांच्या समर्थकांनी या मेळाव्याचे आयोजन करत त्यांना पाठिंबा दर्शविला.
यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्ष दीक्षा महालकर, सुधीर दळवी, कल्पना बुरकुले, आनंद तळणकर, ॲड. दाजी नाईक, मोरगाव सोसायटी चेअरमन ठाकूर, कळणे सरपंच अजित देसाई, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, माजी सरपंच श्री. धुरी, दिलखुश देसाई, सासोली उपसरपंच अनिरुद्ध फाटक उपस्थित होते. नाडकर्णी हे लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे तालुक्यातील नेते आहेत. त्यांनी कधीही आपल्या कार्यकर्त्यांसोबत राजकारण केलेले नाही किंवा आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिलेला नाही. उलट कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आजच्या या मेळाव्यात फक्त नाडकर्णी यांच्या प्रेमापोटीच शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही राजकारणामध्येच पूर्णतः सक्रिय व्हायलाच पाहिजे. तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहोत, अशा भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मांडल्या. भाजप पक्षाच्या वरिष्ठांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांपूर्वी पक्षात सामील करून घेतले पाहिजे. आम्ही सगळे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. वरिष्ठांनी तसा निर्णय न घेतल्यास आम्हाला विचार करावा लागेल. आम्ही नाडकर्णींसारख्या सर्वसमावेशक नेत्याला कधीही सोडून जाणार नाही. ते ठरवतील त्याच दिशेने जाणार असल्याचा सूर बहुसंख्य जणांनी यावेळी आपल्या भाषणातून मांडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.