-लाडक्या बहिणींसाठी नागरी सहकारी पतसंस्था

-लाडक्या बहिणींसाठी नागरी सहकारी पतसंस्था

Published on

लाडक्या बहिणींसाठी नागरी पतसंस्था
डॉ. सोपान शिंदे ः तालुकास्तरावर पालक अधिकारी नियुक्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या महिलांना आर्थिक साह्य देण्यात येते अशा महिलांची नागरी सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. तसेच लाभार्थी महिलांना याबाबत निकषांची माहिती देण्यासाठी व साह्य करण्यासाठी पालक अधिकारी तसेच साहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली.
महिला व बालविकास विभागाच्यावतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची गाव तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असलेली नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येईल. त्या पतसंस्थेत गाव कार्यक्षेत्रासाठी २५० सभासद संख्या व दीड लाख भागभांडवल, नगरपालिका कार्यक्षेत्रासाठी ५०० सभासद संख्या व ५ लाख भागभांडवल, तालुका कार्यक्षेत्रासाठी ५०० सभासद संख्या व ५ लाख भागभांडवल आणि जिल्हा कार्यक्षेत्रासाठी दीड हजार सभासद संख्या व १० लाख भागभांडवल अपेक्षित आहे. महिला सहकारी पतसंस्थेचे सभासद होण्यासाठी महिला व बालविकास विभाग यांनी प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व साहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी म्हणून साहाय्यक निबंधक साहेबराव दत्तात्रय पाटील यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com