जी.जी.पी. एस. मध्ये दहावीतील गुणवंतांचा सत्कार
rat३p१.jpg-
२५N७४९५०
रत्नागिरी : जीजीपीएसमध्ये दहावीतील गुणवंतांचा सत्कार करताना सीए मंदार गाडगीळ.
---
‘जीजीपीएस’मध्ये गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : येथील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेत (जीजीपीएस) दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय समितीचे अध्यक्ष सीए मंदार गाडगीळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, प्रशालेतील १८३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. अधिश नागवेकर, दिया गोठणकर, आयुष झोरे यांनी पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवले आहे. प्रशालेतून ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले ५२ विद्यार्थी व विशेष प्रावीण्य मिळवलेले १२३ विद्यार्थी आहेत. या वेळी मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर, गुरूकुल विभागप्रमुख वासुदेव परांजपे, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख शुभदा पटवर्धन उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.