पोलिसांचा रत्नागिरीत दंगा काबू योजनेचा सराव
-rat३p५.jpg-
२५N७४९५४
रत्नागिरी- शहराजवळील चंपक मैदानावर दंगल काबू योजनेचा सराव करताना शहर व ग्रामीण पोलिस.
पोलिसांकडून ‘दंगल काबू’चा सराव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः मोहरम आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर, ग्रामीण पोलिसांनी चंपक मैदान येथे दंगल काबू योजनेचा सराव केला. या वेळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याने दंगलसदृश परिस्थिती घटनास्थळी निर्माण करण्यात आली होती.
मोहरम, आषाढी एकादशीच्या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. रत्नागिरी शहर, ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या चंपक मैदान येथे दंगल काबू योजनेचा सराव केला. दंगल काबू सरावामध्ये ३० आरसीपी, दोन्ही पोलिस ठाण्यातील ३० कर्मचारी, ४ वाहने, ६४ लाठ्या, ६४ हेल्मेट, ३० शिल्ड, १० रायफल्स, एक मेगाफोन, एक गॅसगन, स्ट्रेचर, १२ बोर रायफल आदी शस्त्रांचा समावेश होता. पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यासह शहर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.