क्राईम

क्राईम

Published on

विजेच्या धक्क्याने
५ म्हशींचा मृत्यू
चिपळूण ः मिरजोळी कोलेखाजन येथील शेतकरी प्रमोद कुंडलिक कदम यांच्या ५ म्हशींचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेत १ म्हैस गंभीर जखमी झाली असून, शेतकऱ्याचे ५ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या पंचनाम्यानुसार, या पाच म्हशींची बाजारभावानुसार किंमत ५.२५ लाख रुपये इतकी आहे. ही घटना केवळ अपघात नसून महावितरणच्या दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत नुकसानभरपाई केवळ अनुदानाच्या मर्यादित निकषांवर न ठरवता प्रात्यक्षिक हानीचा विचार करून ती दिली जावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी चालू विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवत सदर घटनेत संबंधित शेतकऱ्याला पूर्ण ५ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ मंजूर करण्यात यावी, अशी स्पष्ट रकमेत मागणी केली आहे.

पॅंटच्या खिशातून
३५० रुपयांची चोरी
चिपळूण ः खुंटीला लावलेल्या पॅन्टमधील खिशातून चोरट्याने ३५० रुपये चोरून नेल्याची फिर्याद कापसाळ येथील कल्पेश महेश साळवी यांनी (वय २५) चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. २९ जूनला रात्री हा प्रकार घडला.

खेर्डीतील जुगारावर
पोलिसांची कारवाई
चिपळूण ः खेर्डी बाजारपेठेत जुगार चालवणाऱ्या एका संशयिताला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ७९५ रोख रुपये जप्त करण्यात आले आहेत. खेर्डी बाजारपेठेत सचिन साळुंके (वय ४८, रा. मुरादपूर, कुंभारवाडी) हा जुगार चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. चिपळूण पोलिस ठाण्यातील कर्मचारी विशाल धाडवे याच्या फिर्यादीनुसार साळुंके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com