आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना सन्मानपत्र
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना मिसा व डीआयआरअंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांना तहसील कार्यालयातर्फे सन्मानपत्र देण्यात आले. या वेळी संविधान हत्यादिनानिमित्त पोस्टर्स प्रदर्शनही करण्यात आले.
तहसील कार्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते. या प्रसंगी गलांडे म्हणाले, २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीत घटनेमधील तरतुदींचा आधार घेऊन आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या वेळी विरोध करणाऱ्यांना तुरुंगवास सोसावा लागला. आपल्या देशाला संघर्ष करून स्वातंत्र्य मिळाले आहे. आणीबाणीच्या काळात मिसा, डीआयआरअंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणांसाठी तुरुंगवास झाला. त्या लढवय्यांचा काल सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बलवंत मधुसूदन वेलणकर, शिवराम बाळकृष्ण ठीक, सुभाष श्रीधर राणे, प्रदीप चंद्रकांत परूळेकर, यशवंत रत्नू पाले, वैदेही श्रीराम रायकर, विवेक जगन्नाथ भावे, संजय शांताराम केतकर, सुहासिनी मधुकर रसाळ, महेंद्र रामकृष्ण सुर्वे, सुनंदा पुरूषोत्तम बेर्डे यांना सन्मानपत्र देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.