ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत पाटील यांचा सन्मान

ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत पाटील यांचा सन्मान

Published on

-rat२p५.jpg-
२५N७४६८४
रत्नागिरी ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे शाखेचे स्वीकृत कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील यांचा सत्कार करताना कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य.
----
रंगकर्मी श्रीकांत पाटील यांचा सन्मान
नाट्य परिषदेचा पुढाकार; कोकणदीप पुरस्काराबद्दल गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः तालुक्यातील ज्येष्ठ रंगकर्मी तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे स्वीकृत कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील यांना कोकणदीप प्रतिष्ठानने कोकणदीप पुरस्काराने सन्मानित केले. या निमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. साहित्यविषयक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी पाटील यांनी बसणी पंचक्रोशी वाचनालय, कुवारबाव येथील स्वामी स्वरूपानंद वाचनमंदिर अशा दोन संस्थांचे अध्यक्षपद आणि नाचणे येथील कुसुमताई अभ्यंकर वाचनमंदिराचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, उपाध्यक्ष श्रीकांत भाटवडेकर, खजिनदार सतीश दळी, कार्यवाह वामन कदम, सहकार्यवाह अमेय धोपटकर, सदस्य ॲड. रजनी सरदेसाई, विजय पोकळे, नागेश बेर्डे, शाम मगदूम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com