-लांजातील कारवाईविरोधात फेरीवाला संघटना आक्रमक

-लांजातील कारवाईविरोधात फेरीवाला संघटना आक्रमक

Published on

-rat२p४९.jpg-
२५N७४८३९
लांजा ः महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे यांना निवेदन देताना महाराष्ट्र समर्थ फेरीवाला विक्रेता संघटना लांजाचे अध्यक्ष महेश नारकर व इतर व्यापारी.
----
कारवाईविरोधात फेरीवाले आक्रमक
लांजा तहसीलदारांना निवेदन ; कुटुंबासह रस्त्यावर उतरणार
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३ ः नगरपंचायत हद्दीमध्ये लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर बसणारे छोटे व्यापारी (हॉकर्स) यांच्यावर होणारी कारवाई तत्काळ थांबवावी, अन्यथा कुटुंबासह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा महाराष्ट्र समर्थ फेरीवाला विक्रेता संघटना शाखा लांजाच्यावतीने प्रशासनाला दिला आहे. याबाबत महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे यांना निवेदन देण्यात आले.
लांजा शहरात छोटे व्यापारी भाजीपाला, वडापाव, कटलरी, फळे, फुले, नारळ, चप्पल व्यवसाय अशा अनेक प्रकारचे व्यवसाय गेली ३० ते ४० वर्षे लांजा महामार्गाच्या दुतर्फा करत आहेत. हे ३०० नोंदणीकृत छोटे व्यापारी आहेत आणि स्थानिक आहेत.
प्रशासनाने अचानक पावसाळ्याच्या दिवसात धंदे बंद करा व जागा मोकळी करा, असे आवाहन केले. बांधकाम विभागाकडून जरी सांगितले तरी स्थानिक व्यापारी म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून कोणतीही चर्चा न करता कोणीतरी बांधकाम विभागाकडे अर्ज करतो की, बाजारपेठ ताबडतोब उठवा व त्यांचे ऐकून ३०० लोकांचा जराही विचार न करता उठायला सांगत आहात. महामार्गाचे काम १० ते १२ वर्षे चालू आहे. काम चालू असताना आमच्या कुठल्याही व्यापाऱ्याने कधीही कामात अडथळा आणलेला नाही. ज्या ठिकाणी काम चालू नसते तसेच कोणालाही अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी बसून व्यापारी व्यापार करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या अर्जाचा विचार करून ३ जुलैला जी मोहीम चालू करण्याचा विचार करत आहात ती ताबडतोब थांबवावी अन्यथा ३०० व्यापाऱ्यांना कुटुंबासह रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. यावेळी महाराष्ट्र समर्थ फेरीवाला विक्रेता संघटना लांजाचे अध्यक्ष महेश नारकर, सचिव संजय बेनकर आदींसह व्यापारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com