राजापुरातील रस्त्यावर वाहनचालकांची कसरत

राजापुरातील रस्त्यावर वाहनचालकांची कसरत

Published on

-rat३p२०.jpg
२५N७४९८८
ःराजापूर ः मुख्य रस्त्यावरील खड्डेमय भागामध्ये झालेली वाहतूककोंडी.
-------
राजापुरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे
वाहनचालकांची कसरत ः पालिकेची आश्वासने हवेत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ : शहरातील जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चिखलमय खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यातून अंगावर उडणारे चिखलमिश्रित पाणी चुकवताना नागरिकांची त्रेधातिरपीट उडत आहे. हे कमी म्हणून की, काय नगर पालिकेने दुरुस्ती करण्यासाठी कुशे मेडिकल परिसरामध्ये जेसीबीच्या साह्याने खोदून ठेवलेल्या रस्त्याची अद्यापही दुरुस्ती केलेली नाही.
शहरातील जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य वर्दळीच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे पार दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर कुशे मेडिकलसमोरील भागामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खड्डे पडले आहेत. या भागातील खड्ड्यांचे प्रमाण पाहता या भागामध्ये डांबरी रस्ता कुठे आहे, याच शोध घेण्याएवढी बिकट स्थिती झाली आहे. रस्त्यातील खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला याच भागामध्ये सातत्याने वाहतूककोंडीही होत आहे. मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी लोकांसह वाहनचालकांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. राजकीय पक्षांकडून निवेदनेही देण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींकडून खड्डेमय रस्त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही पालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत; मात्र, त्यानंतरही खड्डेमय रस्त्याची समस्या जैसे थे राहिली आहे. दुसऱ्या बाजूला रस्त्यातील खड्ड्यांची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने पालिकेने कुशे मेडिकलच्या परिसरामध्ये रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवण्यात आला आहे. या साऱ्यामध्ये नगर पालिका प्रशासन दुरुस्तीचे आश्‍वासन देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com