-मुसळधार पावसाने भातपीक पाण्याखाली

-मुसळधार पावसाने भातपीक पाण्याखाली

Published on

-rat३p१४.jpg-
२५N७४९७६
साखरपा : मुसळधार पावसामुळे पाण्यात बुडालेली भातशेती.
-rat३p१५.jpg-
२५N७४९७७
पाण्याखाली गेलेला पुर्ये सीमेचा पूल
-rat३p१६.jpg-
२५N७४९७८
धोक्याच्या पातळीवर वाहणारी काजळी नदी.
---
मुसळधार पावसाने भातपीक पाण्याखाली
साखरपा पंचक्रोशीला झोडपले; पुर्ये पूल पाण्याखाली, काजळी नदी धोक्याच्या पातळीवर
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३ : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पंचक्रोशीला मुसळधार पावसाने बुधवारपासून (ता. २) झोडपून काढले आहे. त्यामुळे साखरपा परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. नव्यानेच लावणी लावलेल्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून, भातपिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक सखल ठिकाणी पाणी साचले असून, चौपदरीकरणामुळे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
बुधवारी सकाळी सुरू झालेला पाऊस अखंड रात्रभर पडून गुरूवारी सकाळीही कायम आहे. यामुळे सर्वत्र पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. हे पाणी आता भातशेतातून शिरले आहे. शेतकऱ्‍यांनी नुकताच भातलावणीला प्रारंभ केला आहे. परिणामी, अजून लावणी लावलेली रोपे ही कोवळी आहेत. आता पावसाचे पाणी भातशेतीत शिरल्याने ही कोवळी रोपे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर असाच यापुढेही कायम राहिला तर ही पिके वाहून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
साखरपा गावालगत वाहणाऱ्‍या काजळी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. चार वर्षांपूर्वी साखरपा गावपरिसरातील काजळी नदीपात्राचा गाळ उपसा केल्याने तिची खोली वाढली आणि पात्रही गाळमुक्त झाले. त्यामुळे साखरपा गावाला असलेला पुराचा धोका टळला असला तरी सध्या पडत असलेल्या पावसाने या नदीवर असलेल्या पुर्ये गावात जाणारा सीमेचा पूल मात्र गेले दोन दिवस पाण्याखाली गेला आहे. पुलावरून सुमारे तीन फूट पाणी वाहात आहे.
---
चौकट
- rat३p१७.jpg
२५N७४९७९
ःसाखरपा ः साखरपा बसस्थानक परिसरात साठलेले पाणी.
साखरपा बसस्थानकातही पाणी...
साखरपा बसस्थानकाला पावसामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वच्छतागृहाच्या परिसरात पाणी साचल्यामुळे प्रवाशांची पंचाईत होत आहे. हे स्वच्छतागृह कसे वापरायचे, हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साखरपा बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. हे पाणी नेमके स्थानकातील स्वच्छतागृहाच्या परिसरातच साचले आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान स्वच्छतागृहाकडे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी पंचाईत होत आहे. त्याचप्रमाणे स्थानकाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू होते. त्या कामासाठीचा वाळूचा ढीगही त्याच पाण्यात पडून आहे. स्वच्छतागृहासमोरच या कामाच्या वाळूचा ढीग टाकल्यामुळे प्रवाशांना स्वच्छतागृहाकडे जाणे अशक्य होऊन बसले आहे. विशेषत: महिला प्रवाशांना यामुळे मोठी अडचण होत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराकडे परिवहन कर्मचार्‍यांनी तातडीने लक्ष घालून प्रवाशांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com