चिवेली शाळेत शैक्षणिक कार्यशाळा
चिवेली विद्यालयात
शैक्षणिक कार्यशाळा
चिपळूण ः तालुक्यातील चिवेली येथील आदर्श विद्यामंदिरात ‘आनंदाचे डोही’ कार्यशाळा नुकतीच झाली. कार्यशाळेत
मुख्याध्यापक संजय चव्हाण, सेवासाधना प्रतिष्ठानचे विनित वाघे यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात ‘महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल’ याबाबत थ्रीडी मॅपद्वारे मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात ‘करवंटी हस्तकला’ कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना नारळाच्या करवंटीपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः करवंटीपासून बाउल, मोबाईल स्टॅन्ड, कीचेन, कानातील रिंग आदी वस्तू बनवल्या. हस्तकला प्रशिक्षक शुभम लिबे, ज्येष्ठ शिक्षक नितीन गुरव, महेश चव्हाण, शैलेश आंबरे, रियाज अत्तार, अक्षय साळवी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विज्ञानरंजन स्पर्धेतील
विजेत्यांचा सत्कार
मंडणगड ः रत्नागिरी जिल्हा विज्ञानरंजन स्पर्धेतील गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये उत्साहात झाला. मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे यांनी जिल्ह्यात तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवलेल्या वेदिका वाळुंज व ४ गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेमध्ये विद्यालयातून २८१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक शांताराम बैकर, शिक्षक प्रतिनिधी नरेश माटवणकर, ज्येष्ठ शिक्षक तानाजी याचवाड आदी उपस्थित होते.
हिंदी सक्ती रद्दचा
चिपळुणात आनंदोत्सव
चिपळूण : महाराष्ट्र राज्य सरकारने हिंदी भाषेचा जीआर रद्द केला. त्याचा आनंदोत्सव उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर व मनसे पक्षातर्फे चिंचनाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवसैनिक व मनसैनिकांनी ‘मराठी माणसा जागा हो, महाराष्ट्राचा धागा हो’ असे म्हणत एकमेकांना तसेच नागरिकांना पेढे व लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.