कणकवली ःगळती
kan21.jpg
75032
कणकवली : येथील रेल्वेस्थानकाच्या छपरातून गळती सुरू झाली आहे.
-----------
कणकवली रेल्वेस्थानकाच्या
सुशोभीकरणाला गळती
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ : येथील रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण गतवर्षी झाले. यासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु वर्ष पूर्ण होण्याअगोदरच या सुशोभीकरणाला गळती सुरू झाली आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील तब्बल १२ रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण गतवर्षी झाले. यात सर्वप्रथम कणकवली रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागाचे सुशोभीकरण झाले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा कोटी रुपयांची निविदा काढली होती. ठेकेदाराने वर्षभरात हे काम पूर्ण केले. या कामाचे उद्घाटन ९ ऑगस्ट २०२४ रोजी झाले होते. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला वर्षही झाले नसून, यंदा पावसाळ्यात सुशोभीकरणाच्या भागातून पाणी गळू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही गळती सुरू झाली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही. खरे पाहता रेल्वेस्थानकाच्या बहुतांशी भागात ही गळती आहे.
फलाटावरील छपरालाही गळती आहे. त्यामुळे प्रवाशांना बसता येत नाही. मुसळधार पावसामध्ये प्रवाशांना बसायला जागाही मिळत नाही, अशी स्थिती आहे. झडीचा पाऊस आला तर फलाटावरही उभे राहणे अवघड होऊन जाते. त्यातच फलाटावर रेल्वे गाडी लागली आणि पाऊस सुरू असला तर प्रवाशांची तारांबळ उडते. स्थानकावारील फलाटावर बसण्यासाठी फारशी जागा नसल्याने प्रवासी सुशोभीकरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बाकड्यांवर बसतात. मात्र, सुशोभीकरणाच्या छपराला गळती होऊ लागले आहे. त्यामुळे प्रवाशांनी बसायचे कुठे, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.