नांदगावातील नद्या-नाले मुसळधार पावसामुळे तुडुंब
swt332.jpg
75064
नांदगाव ः संततधार पावसाने परिसरातील नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
नांदगावातील नद्या-नाले तुडुंब
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३ ः नांदगाव परिसरात बुधवारी (ता. २) कोसळलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले तुडुंब भरून गेले. पियाळी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने लगतच्या शेतजमिनीत नदीचे पाणी घुसले. मेमध्येच सक्रिय झालेला पाऊस शेती कामासाठी आतापर्यंत शेतीच्या दृष्टीने योग्य पध्दतीने सुरू आहे; मात्र मंगळवारपासून आक्रमक पवित्रा घेऊन बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्याने छोटे नालेही नदीच्या प्रवाहाच्या वेगाने वाहत तुडुंब भरून शेतजमिनीत घुसले. सध्या नांदगाव परिसरात भात लावणीच्या कामांना वेग आला असून हा पाऊस भरडी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. नांदगावात लावणीच्या कामांची लगबग सुरू असल्याने अनेक ठिकाणी शेतात तरवा काढून ठेवला होता. जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारा तरवा सुरक्षित ठिकाणी ठेवताना शेतकऱ्यांची दमछाक झाली. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर साचले होते. सेवारस्ते पाण्याखाली गेले होते. सध्या पडणारा पाऊस दिलासा देणारा पडत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.