साप्ताहिक साहित्य चर्चेचा रविवारी होणार समारोप
साप्ताहिक साहित्य चर्चेचा
रविवारी होणार समारोप
सावंतवाडीः साहित्यिक (कै.) जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आजगाव येथील ‘साहित्य प्रेरणा कट्टा’ आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्यावतीने गेले वर्षभर चालू असलेल्या खुल्या साप्ताहिक साहित्य चर्चेचा समारोप रविवारी (ता.६) सायंकाळी ४.३० वाजता (कै.) जयवंत दळवी यांच्या आरवली येथील जन्मस्थानी होणार आहे. समारोपाच्या या चर्चेस सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती अधिकारी सतीश पाटणकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. खुल्या साप्ताहिक साहित्य चर्चेत आतापर्यत २९ पुस्तकांवर चर्चा करण्यात आली. (कै.) जयवंत दळवी यांच्या जन्मस्थानी होणाऱ्या ‘आत्मचरित्राऐवजी’ या गाजलेल्या पुस्तकावरील चर्चेने या मालिकेचा समारोप होणार आहे. वर्षभर चाललेल्या या साप्ताहिक खुल्या चर्चेत विविध मान्यवर उपस्थित राहिले. या खुल्या साप्ताहिक साहित्य चर्चेच्या समारोपच्या चर्चेस वाचक तथा साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विनय सौदागर, सचिन दळवी व सचिन गावडे यांनी केले आहे.
-----------------
बापर्डे परिसरात
हिंस्त्र श्वापदांचा वावर
देवगडः तालुक्यातील बापर्डे परिसरात भक्षाच्या शोधार्थ हिंस्त्र श्वापदे वस्तीपर्यंत येत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्या असावा असा स्थानिकांचा अंदाज आहे. वस्तीमधील कुत्री लक्ष्य केली जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्थानिकांना सुरक्षितता बाळगण्याची आवश्यकता बनली आहे. सध्या पावसाळा असल्याने ठिकठिकाणी झाडी वाढली आहे. त्यामुळे हिंस्त्र श्वापदांना आश्रय घेणे किंवा लपणे सोपे जाते. भक्षाच्या शोधार्थ हिंस्त्र श्वापदे वस्तीकडे सरकत असल्याचे दिसून येते. बापर्डे परिसरात अशाच प्रकारे हिंस्त्र श्वापदांचा वावर असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांच्या माहितीनुसार तो बिबट्या असावा. तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचे दर्शन स्थानिकांना घडले आहे. गुरांवर हल्ला करण्याचा प्रकारही यापूर्वी घडले होते. आता कुत्रीही लक्ष्य केली जात असल्याचे सांगितले जाते.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.