मुणगे भगवती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गिरवले शेतीचे धडे

मुणगे भगवती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गिरवले शेतीचे धडे

Published on

swt324.jpg
75065
मुणगे ः भगवती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये भातरोपांची लावणी केली.

मुणगे भगवती हायस्कूलच्या
विद्यार्थ्यांनी गिरवले शेतीचे धडे
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ३ ः येथील भगवती हायस्कूलचा ''बांधावरची शाळा'' उपक्रम शेतामध्ये जाऊन साजरा करण्यात आला. कृषी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भात रोपाच्या लावणीचा आनंद घेतला.
मुणगे येथील भगवती हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शेतीचे धडे देण्यासाठी बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तरुणपिढीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पहायला हवे. अधिक उत्पन्नासाठी योग्य नियोजन करून शेती केली पाहिजे. मुलांना शेतीची आवड निर्माण करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थी व शिक्षकांनी बांधावर उतरत भात लावणीचे धडे घेतले तसेच नांगरणी, खत पेरणी याची माहिती सुध्दा शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, सहाय्यक शिक्षिका गौरी तवटे, सहाय्यक शिक्षक हरिदास महाले, प्रसाद बागवे, रश्मी कुमठेकर, स्वप्नील कांदळगावकर, सुविधा बोरकर, नामदेव बागवे, मनोज मुणगेकर, शेतकरी पुरषोत्तम सावंत, रवी सावंत, पूनम सावंत आदी उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षक वर्गाच्या उपक्रमाबाबत ग्रामस्थ व संस्थाचालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
जंगली प्राण्याच्या उपद्रवामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेती करणे सोडले आहे. त्यामुळे शेतीबाबत जनजागृती करून शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, असे मत यावेळी काही ग्रामस्थांनी मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. आपल्या गरजा शेतीच्या माध्यमातून सोडवून अधिक उत्पन्न मिळविले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी चिखल करून शेतामध्ये भातरोपांची लावणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com