वित्तीय संस्थांमध्ये हिंदी भाषिकांची मुजोरी वाढतेय
वित्तीय संस्थांमध्ये हिंदी भाषिकांची मुजोरी वाढतेय
जिल्हा व्यापारी महासंघाची खंत; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, नियंत्रणाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः जिल्ह्यातील विविध शासकीय, खासगी, शेड्युल आणि मायक्रो फायनान्स अशा बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये हिंदी भाषिक शाखा व्यवस्थापन आणि कर्मचारी यांची मुजोरी वाढत आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आणि ज्येष्ठ नागरिकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत यावर नियंत्रण घालण्यात यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, शेड्युल बँका आणि मायक्रो फायनान्स अशा वित्तीय संस्थांमध्ये ६० ते ७० टक्के कर्मचारी वर्ग हा हिंदी भाषिक आहे. यात शाखाधिकारी ही परप्रांतीय असल्याने त्यांनाही मराठी येत नाही. परिणामी या बँकांमध्ये आपल्या कामासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक दिली जात नाही.
एखाद्या ग्राहकाने या कर्मचाऱ्यांशी मराठीमध्ये संवाद साधल्यास त्या ग्राहकाला चांगली वागणूक दिली जाते. याबाबत विचारणा केली असता आम्हाला मराठी येत नाही? आमची कोठेही तक्रार करा? आम्हाला काही फरक पडणार नाही? आम्ही मराठी शिकणार नाही? तुम्हाला हिंदी येत नसल्यास येथील खाते बंद करा, असे सांगितले जाते. एकंदरीत वित्तीय संस्थांमध्ये हिंदी भाषिक शाखा व्यवस्थापन आणि कर्मचारी यांची मुजोरी वाढत आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आणि ज्येष्ठ नागरिकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत यावर नियंत्रण घालण्यात यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, ग्राहक पंचायतचे विष्णुप्रसाद दळवी आदी उपस्थित होते.
चौकट
नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार
राज्याच्या निर्देशानुसार व केंद्राने जाहीर केलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जानुसार प्रत्येक बँकांनी त्यांचे सर्व बोर्ड, माहितीपत्रक, विविध चिठ्ठ्या (पावत्या), भिंतीवरील सर्व माहिती फलक हे स्थानिक भाषेत म्हणजेच मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. मात्र, या सूचनांचे कोणताही शाखा व्यवस्थापकाकडून पालन केले जात नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.