स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरमध्ये गुणवंतांचा गौरव
-rat३p१८.jpg -
२५N७४९८४
पावस ः स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये विद्यार्थिनीला गौरवताना संस्थेचे पदाधिकारी.
-------
स्वामी स्वरूपानंद
शाळेत गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ ः स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर आणि सामंत ज्युनिअर कॉलेजमध्ये स्व. तात्यासाहेब सामंत स्मृतिदिन तथा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात झाला. या वेळी मुख्याध्यापक बाबासाहेब माने, स्मिता पाटील उपस्थित होते. बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला. बारावीतील शुभांगी पोटे, सोहम गवाणकर, यश भोसले, प्राची बाणे, राज सोलकर, तन्वी सटये, विराज शेडगे, जान्हवी कमळे, रिया म्हादये, युवराज गुरव या विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. दहावीतील गुणवंत लावण्या देवळेकर, स्नेहा नागवेकर, पार्थ रांगणकर, यश गुरव, चैतन्य गोगटे, अनुष्का शिंदे, साहील गुरव, आयान मुजावर यांना गौरवण्यात आले. राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेतील अथर्व भरणकर, आर्य मेस्त्री, दिव्या लोटणकर, जागृती मोरे, वैष्णवी नाखरेकर, महिमा सामंत, दिया तारये, चिन्मय आग्रे, आर्यन बिर्जे, आयुष चंदुरकर, ऋशिल डोर्लेकर, सोहम गार्डी, श्रीपाद गोगटे, पवन भरणकर, रूद्र पड्यार, कस्तुरी चव्हाण या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपयेप्रमाणे केंद्र शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.