हिंदी भाषा अध्यादेश रद्दनंतर ठाकरे शिवसेनेकडून जल्लोष
swt318.jpg
75009
देवगड ः येथे सतीश सावंत आणि सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत तालुका शिवसेनेकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
(छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
हिंदी भाषा अध्यादेश रद्दनंतर
ठाकरे शिवसेनेकडून जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ः शालेय अभ्यासक्रमासंदर्भातील हिंदी भाषेचा अध्यादेश राज्य शासनाकडून मागे घेण्यात आल्याबद्दल येथील तालुका शिवसेनेकडून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. मराठी माणसांची ताकद आणि एकजुट यातून दिसली असल्याची प्रतिक्रीया व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली.
शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा समावेश करण्यावरून राजकारण ढवळले होते. यातून ठाकरेगट शिवसेना आणि मनसेकडून संयुक्तपणे याविरूध्द आवाज उठवून मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, राज्य शासनाकडून याबाबतचा अध्यादेश मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. याचा आनंद येथे व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख निलम सावंत -पालव, महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, उपजिल्हाप्रमुख यदूनाथ ठाकूरदेसाई, संदीप कदम, निनाद देशपांडे, संजय देवरुखकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.