सांगुळवाडीतील ''अझोला शेती''ची जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

सांगुळवाडीतील ''अझोला शेती''ची जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Published on

swt335.jpg
75092
तळेरे ः सांगुळवाडी येथील अझोला शेतीची जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक.

सांगुळवाडीतील ''अझोला शेती''ची
जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
तळेरे, ता. ३ ः येथील कृषी महाविद्यालय सांगुळवाडीमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या ''अझोला शेती''ची जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हाधिक्षक व कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी भेट देत पाहणी केली.
विद्यार्थ्यांनी त्यांना अझोला शेतीचे फायदे व महत्त्व सांगितले. हे प्रात्यक्षिक करण्यासाठी कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्राचार्य डॉ. स्वप्नील होळकर, उपप्राचार्य तेजस गायकवाड व विषय तज्ञ प्रा. कार्तिक सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. हे प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी तन्मय सुतार, रितेश एडके, भूषण शेणवी, साहिल करगुटकर, ऋतुराज दुर्गुळे, दर्पण बंडबे, साहिल डोंगरकर, प्रथमेश राबाडे, तेजस नवलू आणि श्रेयस कांबळे या विद्यार्थ्यांचे योगदान लाभले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अझोला शेती उत्पादनापासून होणारे फायदे समजावून सांगितले.
----------------
swt336.jpg
75093
वारगाव ः येथील शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालयात मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.


वारगाव विद्यालयात
वह्यांचे मोफत वाटप
तळेरे, ता. ३ ः मुंबई स्थित कृष्णराज जानकीबाई रामचंद्र कानकेकर यांनी बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या वतीने वारगाव येथील शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय, वारगाव या प्रशालेतील आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या. यामुळे प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाली.
वारगावसारख्या ग्रामीण भागातील गरजू व होतकरू गरिब विद्यार्थ्यी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई ही संस्था दरवर्षी मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच एकनाथ कोकाटे, माजी सरपंच चंद्रकांत कानकेकर, महेंद्र टक्के, सौ. कुबडे, सौ. बाक्रे तसेच सुधाकर कुलकर्णी आदी उपस्थित होते. मुंबई स्थित कृष्णराज जानकीबाई रामचंद्र कानकेकर यांनी बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून या वह्या उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने संस्थेचे आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com