मंडणगड शहर प्रारुप विकास आराखड्याचे मार्गदर्शन

मंडणगड शहर प्रारुप विकास आराखड्याचे मार्गदर्शन

Published on

rat३p११.jpg
P२५N७४९६८
मंडणगड: मंडणगड शहर प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात माहिती देताना नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालिका स्मिता कलकुटकी व अन्य.

‘प्रारूप आराखड्या’बाबत मार्गदर्शन
मंडणगड नगररचनाकडून प्रश्नांचे निरसन ; साहाय्यक संचालिकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३ - मंडणगड नगरपंचायतीचे शहरातील जमीनवापराचे निर्धारण करण्याकरिता तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्याची नागरिकांना माहिती देण्यासाठी नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालिका स्मिता कलकुटकी यांनी २ जुलै रोजी मंडणगड नगरपंचायत कार्यालयास भेट दिली. नगरपंचायत हद्दीत जागेच्या विनियोगासंदर्भात आराखड्यात निश्चित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या झोनची माहिती दिली याचबरोबर आरक्षण पडून जागा अधिगृहीत करण्याची वेळ आल्यास नागरिकांना मिळणारे फायदे व या संदर्भातील शासनाच्या धोरणाची विस्ताराने माहिती दिली. नगरपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना आराखड्याबद्दल माहिती दिली.
या वेळी मुख्याधिकारी अभिजित कुंभार, मंडळ अधिकारी नीलेश गोडगासे, तलाठी मंदार गावकर, रत्नागिरी नगररचना कार्यालयाचे कदम, महसुल विभाग, भूमिअभिलेख व मंडणगड नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. सभेस उपस्थित सर्व खात्यांचे अधिकारी यांनी आराखड्यासंदर्भात नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालिका स्मिता कलकुटकी यांनी शहराच्या विकासाकरिता नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर आरक्षणासंदर्भात नागरिकांनी आपल्या तक्रारी व हरकती नियोजन समितीकडे लिखित स्वरूपात नोंदवणे आवश्यक असल्याचे सांगीतले. नियोजन समिती गरजेनुसार आराखड्यात बदल करणार असल्याचे स्पष्ट केले. आराखड्यासंदर्भातील सुनावणीच्यावेळी हरकतींची सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सभेत नागरिकांनी आपले आक्षेप आणि हरकतीसंदर्भात म्हणणे मांडले.
या सभेस उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक विनोद जाधव, आदेश मर्चंडे, नीलेश सापटे, सुभाष सापटे, नगरसेविका प्रमिला किंजळे, वैशाली रेगे, रेश्मा मर्चंडे, प्रवीण जाधव, माजी जि. प. अध्यक्ष संतोष गोवळे, ग्रामस्थ सचिन शेठ, श्रीपाद कोकाटे, कमलेश शिगवण, राजेश पारेख, शांताराम भेकत, भाऊसाहेब कलमकर, सौरभ लेंढे, साईराज सावंत, यशपाल बोलाडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com