भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे जीपॅट, नायपर परिक्षेत यश

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे जीपॅट, नायपर परिक्षेत यश

Published on

swt337.jpg
75101
सानिका गावडे, जान्हवी बगळे, गौरी धुरी, अनिषा निरवणे, गायत्री नाटेकर, सुरेश चौधरी, काजल कोठावळे.

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे
जीपॅट, नायपर परिक्षेत यश
सावंतवाडीः यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट व नायपर २०२५ परीक्षेत उत्तम यश संपादन केले. फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय परीक्षेत कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व ऑल इंडिया रँकिंग असे ः सानिका गावडे (१२८०), जान्हवी बगळे-एम.टेक (१८९२), एम.फार्म २०३५, गौरी धुरी (२१५४), अनिषा निरवणे (२६२२), गायत्री नाटेकर (३१३४), सुरेश चौधरी (३६१८), काजल कोठावळे (५१७१). जीपॅट ही एम.फार्मसी प्रवेशासाठी लागणारी पात्रता परीक्षा आहे. नायपर ही त्या पुढील पायरी असून, देशातील सर्वोत्तम फार्मसी संस्थांमध्ये शिकण्याची संधी देते. सोबतच शासकीय शिष्यवृत्ती सुद्धा उपलब्ध होते. यामुळे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील उच्चशिक्षण, संशोधन व करिअरचे दार उघडते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.विजय जगताप, ॲस्पायर क्लबचे समन्वयक प्रा.मयूरेश रेडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
----------------
wt338.jpg
75102
कासार्डे ः येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

कासार्डे येथे वृक्षारोपण
तळेरे ः कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण आणि कृषी विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये नरेंद्र बारवकर, सिद्धेश जाधव, यश धुमाळ, मकरंद कोरडे, अथर्व लोणकर, शिवम सरक, गौरव तावरे, तन्मय देशमुख, रोहन किर्दक, अथर्व पवार हे विद्यार्थी होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते, बंडवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वीरेंद्र सुतार, पालक तसेच भूषण बंड ग्रामपंचायत कर्मचारी विद्याधर नकाशे, लक्ष्मण आडीवरेकर, कासर्डे बंडवाडी मुख्याध्यापक बाळकृष्ण जाधव व श्रीमती घुले तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती सुतार व मदतनीस शांताबाई पाताडे इत्यादी उपस्थित होते.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com