पोलिस निरीक्षकांचे व्यापाऱ्यांकडून स्वागत
पोलिस निरीक्षकांचे
व्यापाऱ्यांकडून स्वागत
गावतळे ः दापोली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी नियुक्त झालेल्या महेश तोरस्कर यांचे दापोली तालुका व्यापारी संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात आले. या वेळी संघटनेच्यावतीने जालगाव पेट्रोलपंप आणि केळसकरनाका परिसरात होणारी ट्रॅफिक जाम तसेच दापोली शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच पार्किंग व्यवस्थेबाबत विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर निर्बंध घालावे, अशी मागणीही केली. या वेळी व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. रमजान, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, दिवाळी अशा सर्वच सण-उत्सवात जातीय सलोखा राखा, असे आवाहन तोरसकर यांनी केले. या प्रसंगी दापोली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद आवळे, सचिव मिलिंद शेठ, खजिनदार मयुरेश फाटक, युवराज पेठे कार्यकारिणी सदस्य प्रशांत परांजपे, नंदकुमार शिगवण, नजीर पठाण, किरण करमरकर आदी उपस्थित होते.
ड्रॅगनफ्रूटची
कोकणात लागवड
दापोली ः दापोली कृषी महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षातील कृषिजीविका व पर्णमही गटातील विद्यार्थिनींनी रावे कार्यक्रमांतर्गत कृषिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दापोलीतील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. कुणकेरकर, विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. संतोष वरवडेकर, रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, डॉ. आशिष शिगवण, डॉ. मंदार पुरी तसेच गावचे सरपंच दिनेश आडविलकर, कृषी साहाय्यक सावके व मुख्याध्यापक दिनेश चिपटे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी गुडघे गावातील ड्रॅगनफ्रूटची यशस्वीरित्या शेती करणारे प्रगतशील शेतकरी मंदार दांडेकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. दांडेकर यांनी ड्रॅगनफ्रूट लागवडीविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे सविस्तर माहिती दिली. ड्रॅगनफ्रूट ही एक परदेशातून आलेली; पण आता भारतात आणि कोकणातही यशस्वीरीत्या केली जाणारी उत्तम नगदी शेती आहे. ही शेती विशेषतः सिंचन, चांगली बाजारपेठ आणि निर्यातक्षम उत्पादनासाठी ओळखली जाते.
मराठे महाविद्यालयात
पालकसभा
राजापूर : रयत शिक्षणसंस्थेच्या तालुक्यातील विखारेगोठणे आबासाहेब मराठे महाविद्यालयात झालेल्या पालकसभेला प्राचार्य डॉ. राजाराम राठोड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास भिडे, वैष्णवी भडाळे, प्रा. डॉ. अतुल भावे आदी उपस्थित होते. या वेळी प्राचार्य डॉ. राठोड यांनी महाविद्यालयीन कार्यप्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या विकासाबद्दल चर्चा केली. विलास भिडे यांनी पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कसे सहकार्य करावे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. अतुल भावे यांनी महाविद्यालयीन योजनांची माहिती दिली आणि पालकांना महाविद्यालयातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
शिष्यवृत्तींचा लाभ
घेत ध्येय साध्य करा’
राजापूर ः विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुलभ व्हावे आणि त्यांना आर्थिक ताण पडू नये म्हणून शासनाने आणि विविध सेवाभावी संस्थांनी अनेक शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. त्यामध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती, राजश्री शाहू स्कॉलरशिप, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, हिंदी गुणवत्ता शिष्यवृत्ती, विद्यापीठ शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती, अंत्योदय कार्ड शिष्यवृत्ती, सुभद्राबाईनिधी शिष्यवृत्ती, विविध समाज शिष्यवृत्ती अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती महाविद्यालयात सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असणाऱ्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ घेऊन आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन प्रा. धोंगडे यांनी केले. रायपाटण येथील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या ‘शिष्यवृत्ती नोडल अधिकारपदी’ प्रा. धोंगडे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. मेश्राम, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दाभाडे यांनी केले तर आभार साहाय्यक प्रा. चव्हाण यांनी मांडले.
एनएसएस विभागातर्फे
स्वच्छता अभियान
गुहागर ः रिगल कॉलेज शृंगारतळीच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS)विभागामार्फत आबलोली ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत ग्रामपंचायत, बौद्धवाडी, कोष्टेवाडी, आबलोली बाजारपेठ तसेच बौद्धविहार परिसराची स्वच्छता करण्यात आली. सर्वप्रथम महाराष्ट्र कृषिदिनाच्या औचित्याने ग्रामपंचायत आबलोली आयोजित वसुंधरा अभियानामध्ये वृक्षारोपण करून या स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमीत शिर्के तसेच रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकवर्गाचे स्वागत केले. स्वच्छता अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी परिसरात पावसामुळे वाढलेल्या तण तसेच गवताची बेणणी केली व परिसरातील कचऱ्याची स्वच्छता केली. ग्रामसेवक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना कृषिदिन, वसुंधरा अभियान तसेच एनएसएस विभागाबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.