आंबा बागायतदारांचा देवगडात मोर्चा
swt३३३.jpg
75119
देवगड ः येथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. (छायाचित्र ः वैभव केळकर)
आंबा बागायतदारांचा देवगडात मोर्चा
विविध मागण्या प्रलंबितचः कृषी विभागासह तहसिलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ः तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या सातत्याने होत असलेल्या मागण्यांची तड लागण्यासाठी येथील ‘आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ’ यांच्यावतीने शहरातून शेतकरी मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आर. जे. पवार यांच्यासह कृषि विभागाला देण्यात आले. हातात फलक घेऊन शांततेत मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये तालुक्याच्या विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला मोर्चा येथील गणेश उद्यान मंदिरापासून सुरू होऊन तहसीलदार कार्यालयात पोचला. यामध्ये आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रूमडे, सचिव संकेत लब्दे, खजिनदार शुभम चौगुले, सहसचिव चंद्रकांत गोईम, नीलेश पेडणेकर, अरविंद वाळके, विकास दीक्षित, गुरुनाथ कांबळी, श्रीकृष्ण साटम, सत्यवान गावकर, इंद्रनील कर्वे, रंजना कदम, विमल बलवान, शामल जोशी, नाना जोईल यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील सलग पाच वर्षे वातावरणातील बदलामुळे होत असलेल्या विविध संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासकीय यंत्रणांची अनास्था त्यात अजून भर घालत आहे. यातून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा. हवामानावर आधारित फळ पीक विम्याचे निकष हवामानातील बदलानुसार कोकण विभागासाठी स्वतंत्र असावेत ते राज्यातील आंबा पिकाच्या सध्याच्या प्रचलित निकषांप्रमाणे नसावेत, फळ पीकविमा कालावधी १ ऑक्टोबर ते ३१ मे असा करावा, पोटखराब लागवडीखाली अंतर्भूत करून संपूर्ण क्षेत्राचा विमा करण्यात यावा, फळपीक विम्यामध्ये शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी १०० टक्के परतावा विमा कंपन्या देत नाहीत, हवामान यंत्रणा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कार्यान्वित करून त्याची माहिती थेट राज्य व केंद्र शासनाकडे प्राप्त व्हावी, कृषी विद्यापीठामार्फत शेतकर्यांना अद्ययावत तंत्रज्ञान पोचणे आवश्यक, विमा निकषांचा कालावधी पूर्ण होताच १ महिन्याच्या आत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, मागील विमा परतावा मिळण्यापूर्वी नवीन योजना लागू करू नये, पीक पहाणी नोंद दरवर्षी केवळ नवीन लागवडीसाठीच सक्तीची असावी. जुन्या बागासाठी असलेली सक्तीची अट काढून टाकावी, मुंबई फळबाजारातील आंबा विक्रीची पद्धत बदलून थेट आंबा विक्री होईल व शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल अशा प्रकारची यंत्रणा कार्यरत असावी, तालुक्यातील देवगड, पडेल, मिठबाव या तीन मंडलामध्ये विमा हप्त्यापेक्षाही फार कमी नुकसान भरपाई मिळते, २०२२-२३ ते २०२४ -२५ या वर्षात विमा परताव्याची रक्कम बँकेतील काही खातेदारांची खाती बंद झाल्यामुळे विमा कंपनीकडे परत गेलेली असून ती रक्कम शेतकर्यांच्या संबंधित बँकेत यादीसह पुन्हा पाठविण्यात यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
........................
चौकट
सरसकट कर्जमाफी मिळावी
प्रमाणित खते व किटकनाशके ओळखणारी, माती परीक्षण करणारी अद्ययावत प्रयोगशाळा संदर्भातील मागणी प्रस्ताव रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्रामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला असून तो लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा. कोकण आंबा बोर्ड लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे. यंदा मेमध्ये अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या आंबा नुकसानीमुळे सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
..........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.