31 दिवसानंतर बिबट्याचे पिल्लू संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये

31 दिवसानंतर बिबट्याचे पिल्लू संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये

Published on

-rat३p३३.jpg -
२५N७५०८४
बिबट्याचा बछडा
----------
बिबट्याचा बछडा नॅशनल पार्कमध्ये
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३ ः गेले ३१ दिवस वनविभागाच्या ताब्यात असलेल्या बिबट्याच्या बछड्यास बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथील प्राणिसंग्रहालयात सोडण्यात आल्याची माहिती लांजाचे वनपाल सारिक फकीर यांनी दिली.
बिबट्याच्या बछड्याची आणि त्याच्या आईची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात आला; परंतु बछड्याची आणि बिबट्या मादीची भेट झाली नसल्याने अखेर बछड्यास प्राणिसंग्रहालयात सोडण्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे बछड्यास अखेर ३५ दिवसानंतर प्राणिसंग्रहालयात दाखल करण्यात आले. पुनस संसारे तिठा येथे ८ जूनला रात्रीच्या सुमारास बछडा आढळून आला. बछडा एक महिन्याचे असून नर आहे. बछड्याचे वजन ९५० ग्रॅम होते. पिल्लू २४ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. बछडा तंदुरुस्त आणि हुशार झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com