आषाढी एकादशी वारीसाठी प्रतिपंढरपूर झाले सज्ज

आषाढी एकादशी वारीसाठी प्रतिपंढरपूर झाले सज्ज

Published on

आषाढी एकादशीसाठी प्रतिपंढरपूर झाले सज्ज
दिंडीचा सुवर्णमहोत्सव ; मंदिराचे सुशोभीकरण, पायी वारीचे चौथे वर्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रतिपंढरपूर गणले गेलेले बाजारपेठेतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर सज्ज झाले आहे. मंदिर सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (कै.) दाजीबा नाचणकर व (कै.) अप्पा नाचणकर यांच्या प्रेरणेतून संचालित पायी दिंडीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री भार्गवराम मंदिरातून दिंडीला रविवारी (ता. ६) सकाळी ९.३० वाजता सुरुवात होईल व विठ्ठल मंदिरात दिंडी ११.३० वाजता पोहोचेल. याशिवाय सलग चौथ्या वर्षी शक्तीमंदिर ते भक्तीमंदिर म्हणजेच मारुती मंदिर येथून पायी वारी सकाळी ६.३० वाजता निघून ९ वाजेपर्यंत मंदिरात पोहोचणार आहे.
विठ्ठल मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला दिंडी येते. १९७५ पासून विठ्ठलभक्त दाजीबा नाचणकर व अप्पा नाचणकर यांनी पुढाकार घेऊन ही दिंडी भार्गवराम मंदिर येथून प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात आणायला सुरुवात केली. यंदा मोठ्या प्रमाणात ही दिंडी आयोजित करण्याचा निर्णय वारकरी संप्रदायाने घेतला आहे. सकाळी ९.३० वाजता परटवणे येथील श्री भार्गवराम मंदिर येथून वाजतगाजत आणि सुशोभित चित्ररथातून, ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांची पालखी घेऊन दिंडी विठ्ठल मंदिरामध्ये येणार आहे. विठ्ठल मंदिरात मध्यरात्री दीड वाजता एकादशीनिमित्त पूजेचा मान दाजीबा नाचणकर यांचे नातू संतोष नाचणकर व कल्पना नाचणकर यांना मिळणार आहे. विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद तथा मराठे, सचिव विजय पेडणकर, खजिनदार प्रमोद रेडीज, ज्येष्ठ पदाधिकारी अशोक मयेकर व सर्व कार्यकर्ते आषाढी एकादशीचे नियोजन करत आहेत.
----
भजनातून विठुरायाचा गजर
विठ्ठल मंदिरात सकाळपासून भजनांचे आयोजन केले आहे. सकाळी ८ वाजता श्री विठ्ठल मंदिर संस्था भजन मंडळ, १० वा. केतन जोगळेकर, ११ वा. माऊली भजन मंडळ (रवींद्रनगर, कुवारबाव), दुपारी १२ वा. कदम बुवा, १ वा. स्वानंद भजन मंडळ, ३ वा. उत्कर्ष भजन मंडळ (भाटीमिऱ्या), सायंकाळी ४ वा. गोवेकर बुवा, ५ वा. दत्तप्रासादिक भजन मंडळ (बुवा भगवान लोकरेबुवा), ६ वा. अमेय पंडित, ७ वा. विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ यांची भजने रंगणार आहेत. ७.३० वा. विठुरायाची पालखी बाजारपेठेत प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com