कुडाळ-आंबेडकरनगरला पुराचा वेढा

कुडाळ-आंबेडकरनगरला पुराचा वेढा

Published on

swt343.jpg
75123
कुडाळ ः तालुक्यात मुसळधार पावसामुळे भंगसाळ जुने पूल पाण्याखाली गेले.
swt344.jpg
N75124
कुडाळ ः बांव रस्ता पाण्याखाली गेला होता. (छायाचित्रे ः अजय सावंत)

कुडाळ - आंबेडकरनगरला पुराचा वेढा
तालुक्यात धुवाँधारः बहुतांश मार्गांवर पाणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ः तालुक्यात काल (ता.२) पासून धुवाँधार पाऊस कोसळत असून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील घरापर्यंत दाखल झाले असून पुराने १० घरांना वेढा दिला आहे. तेथील ३५ जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. काळपनाका येथून शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर गुलमोहर हॉटेलनजिक पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला. तसेच कर्ली नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. या नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात येणाऱ्या कुडाळ, पावशी, बाव, सरंबळ, चेंदवण या गावातील नागरिकांना दक्षतेचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु झाला. रात्री उशिरापर्यत तो कायम होता. या पावसामुळे शहरातील सिद्धिविनायक हॉलनजिक रेल्वेस्टेशन रोड-बांव रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग बंद झाला. त्यामुळे पर्यायी मार्गाने या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली. बांव रस्त्यावरील एसटी वाहतूक बंद ठेवली आहे. पंचायत समितीच्या मागील बाजूला परप्रांतीय नागरिकांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले. कुडाळ काळपनाका, पावशी व भागात शेतांत पुराचे पाणी पसरल्याने शेती पाण्याखाली गेली आहे. आवळेगाव कुसगाव मार्गावरील कॉजवेवर खड्डा पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळेच या मार्गावरील एसटी वाहतूक हिंदेवाडी मार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
येथील भंगसाळ नदीला पूर आल्याने या नदीच्या पुराचे पाणी नदीकिनारील भागात शिरले. शहरातील हॉटेल गुलमोहरनजिक मुख्य रस्त्यावर तसेच रेल्वेस्टेशन रोडवर सिद्धिविनायक हॉलनजिक पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व अन्य भागात घरापर्यंत पुराचे पाणी दाखल झाले आहे. आंबेडकर नगरमधील १० घरांना पुराने वेढा दिला आहे. तेथील ३५ जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. कर्ली नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात येणाऱ्या कुडाळ, पावशी, बाव, सरंबळ, चेंदवण या गावातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवश्यक सूचना निर्गमित केल्या आहेत. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून ये-जा करू नयेत, सखल भागात तसेच कच्च्या घरात राहणाऱ्यांबाबत ग्रामपंचयातींनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, आवश्यकतेनुसार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यावे, पुराचे पाणी आलेल्या पुलांवरून वाहतूक होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, तसेच अशा पुलाच्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवावेत. शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांच्या संपर्कात रहावे, शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे, विशेषतः पूरस्थिती निर्माण होवून त्याकरिता होड्यांची आवश्यकता लागल्यास होड्या त्वरित उपलब्ध होतील या अनुषंगाने आवश्यक ते नियोजन तालुकास्तरावरून करण्यात यावे. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरित माहिती द्यावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

चौकट
कर्ली नदी धोका पातळीजवळ
तालुक्यात १७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कर्ली नदीची इशारा पातळी ९.९१० मीटर इतकी असून या नदीची धोका पातळी १०.९१० मीटर इतकी आहे. सद्यस्थितीत ती १०.०० मीटर इतकी झालेली आहे. या नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. तसेच तालुक्यातील अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com