-कोकंबाआळीतील इमारतीच्या सेफ्टी टॅंकमध्ये स्फोट

-कोकंबाआळीतील इमारतीच्या सेफ्टी टॅंकमध्ये स्फोट

Published on

-rat३p४५.jpg-
२५N७५१३७
दापोली ः स्फोट झालेली सेफ्टी टँक
-----
इमारतीच्या सेफ्टी टॅंकमध्ये स्फोट
कोकंबाआळीतील घटना ; परिसरात दुर्गंधी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ४ ः शहरातील कोकंबाआळी परिसरात एका धोकादायक इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये सोमवारी (ता. ३०) रात्री स्फोट झाला. त्यामुळे टाकीतून बाहेर पडलेला मैला थेट पंचायत समिती परिसरातील घरांपर्यंत उडाला होता. या परिसरात दुर्गंधी पसरलेली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोकंबाआळीत डोंगर उत्खनन करून तीन सदनिकांची इमारत उभारलेली आहे. या स्फोटाचा परिणाम इमारतीच्या पायाभूत रचनेवर झाला असून ती कोसळण्याचा भीती आहे. या घटनेची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा कृपा घाग यांनी धोकादायक इमारतीची पाहणी केली आहे. तातडीने चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश प्रशासनाला त्यांनी दिले. याबाबत नगराध्यक्षा कृपा घाग म्हणाल्या की, या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू नये यासाठी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. या घटनेनंतर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी इमारतीच्या संरचनात्मक तपासणीसही केली जाईल. दरम्यान, या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली आहे.
---
नगरपंचायतीचे दुर्लक्ष
स्फोट झाल्यानंतर येथील स्थानिक रहिवासी प्रशांत जाधव यांच्या कंपाउंडमध्ये सर्व मैला व सांडपाणी पसरलेले होते. याबाबत प्रशांत जाधव यांनी सांगितले, ही इमारत तीन मजली आहे. त्यात १२ फ्लॅट आहेत. सध्या १० फ्लॅट चालू अवस्थेत आहेत. दोन बंद आहेत. एका कुटुंबामध्ये चार मुले आणि नवरा-बायको अशी सात ते आठ माणसे रहात आहेत. सुमारे ७० ते ८० लोकांचे वास्तव्य या इमारतीत आहे. ती टाकी एकदाही साफ केलेली नव्हती. त्या इमारतीला सुमारे १२ वर्ष झाली आहेत. वारंवार शौचालयाच्या टाकीसंदर्भात तक्रार व पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने आजपर्यंत दुर्लक्षच केले. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेतच लक्ष घालून या इमारतीचा व शौचालयाच्या टाकीचा त्वरित बंदोबस्त करावा. अन्यथा आम्हाला उपोषण करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com