कवयित्री सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहाला विशाखा पुरस्कार

कवयित्री सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहाला विशाखा पुरस्कार

Published on

75267

कवयित्री सरिता पवार यांच्या
काव्यसंग्रहाला विशाखा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या काव्यसंग्रहाला विशाखा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नाशिक येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख अतिथी प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड, कुसुमाग्रज अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकतर्फे दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील साहित्यिकांच्या प्रथम काव्यसंग्रहास त्यावर्षीचा विशाखा पुरस्कार दिला जातो. दरम्‍यान, पवार यांच्या काव्यसंग्रहाला यापूर्वी मध्यप्रदेश राज्यातील वसंत राशीनकर काव्यासाधना पुरस्कार, काव्यरासिक मंडळ डोंबिवलीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह, एटीएम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार, कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार, राज्यस्तरीय सारांश पुरस्कार मिरज, राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार बुलढाणा, राज्यस्तरीय आई पुरस्कार राजापूर, सावित्रीबाई फुले पुरस्कार वेंगुर्ले, ‘कोमसाप’चा नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com