स्पर्धा परीक्षांसाठी ''एआय'' फायदेशीर
swt41.jpg
75215
सावंतवाडीः येथील पंचम खेमराज महाविद्यालयात (कै.) बापूसाहेब महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.
स्पर्धा परीक्षांसाठी ‘एआय’ फायदेशीर
जिल्हाधिकारी अनिल पाटीलः सावंतवाडी महाविद्यालयात बापूसाहेब महाराजांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता एआयचा वापर करावा. या आधुनिक तंत्रज्ञानाचा निश्चितच फायदा होईल, असे मार्गदर्शन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले. पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांचे काम चांगले होते. त्यांनी त्यावेळी आरोग्य, शिक्षण, रस्ते अशा प्रश्नांना महत्त्व दिले होते. यातूनच त्यांची दूरदृष्टी समजते असेही ते म्हणाले.
(कै.) बापूसाहेब महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आज येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाकडून साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, राणी शुभदादेवी सावंतभोसले, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंतभोसले, संस्थानचे राजगुरू भारती महाराज, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, पंचम खेमराज महाविद्यालय प्राचार्य दिलीप भारमल, जयप्रकाश सावंत, सतीश सावंत, दिलीप देसाई, शामराव सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, ‘‘या ठिकाणी जिल्ह्यातील मुले ही दहावी-बारावीपर्यंत पुढे दिसतात. मात्र, हा पायंडा त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयार पाहिजे. यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती अभ्यास करता याला महत्त्व नाही तर तो कसा करता तसेच त्यातील काय बारकावे टिपणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने नियोजनबद्ध अभ्यास करून आपण पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे. प्रशासकीय सेवेत अनेक संधी आहेत. त्या दृष्टीने येथील विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आमच्याकडून नेहमीच राहणार आहे. मुलांनी स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्याचा फायदा निश्चितच होईल.’’
यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे भोसले म्हणाले, ‘‘या ठिकाणी बापूसाहेब महाराज यांच्या माध्यमातून ब्रिटिश काळात अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. मात्र, अन्य देशांच्या तुलनेत आमचे संस्थान छोटे असल्यामुळे त्यांची दखल म्हणावी तशी घेतली गेली नाही. मात्र, येणाऱ्या पिढीने हे काम केले पाहिजे. बापूसाहेब महाराजांचे कार्य देशभर पोहोचले पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’ यावेळी त्यांनी बापूसाहेब महाराजांच्या अनेक आठवणी विषद केल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
चौकट
बापूसाहेब महाराज लोककल्याणकारी राजा
श्री. पाटील यांनी बापूसाहेब महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला तसेच त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले, "बापूसाहेब महाराज हे लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी ब्रिटिशांच्या काळात आपल्या राज्यातील जनतेला आवश्यक असलेले सकारात्मक निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महात्मा गांधीजींनी त्यांना राम राजे असा त्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल निश्चितच घेतली गेली पाहिजे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.