माजी विद्यार्थी प्रशालेचे आधारस्तंभ
swt42.jpg
75216
वायरी भूतनाथ ः येथील रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविताना सरपंच भगवान लुडबे. सोबत मुख्याध्यापक संजय खोचरे, माजी मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर आदी.
माजी विद्यार्थी प्रशालेचे आधारस्तंभ
सरपंच भगवान लुडबे ः वायरी रेकोबा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : माजी विद्यार्थी शाळेला विविध रूपात मदत करतात. शाळेची आठवण काढतात हे अभिमानास्पद आहे. माजी विद्यार्थी हा प्रशालेचा आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान लुडबे यांनी येथे केले.
वायरी येथील रेकोबा हायस्कूलचा ४६ वा वर्धापन दिन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा झाला. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी एच. डी. गावकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विरेश नाईक, माजी मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर, पालक व पत्रकार संदीप बोडवे, प्रतीक्षा परकर, श्रेया बोडवे, शुभदा शिंदोळकर, संभाजी कोरे, रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, दत्तात्रय गोसावी, यशवंत गावकर तसेच माजी विद्यार्थी ऋतिक चव्हाण, भावना करलकर, सिद्धेश कवटकर, आकांक्षा लुडबे, रामचंद्र डोईफोडे, विनय नेसवणकर, निखिल चव्हाण, तुकाराम हारकर, अंकिता परुळेकर, भावना सरमळकर, रिया गावकर, साक्षी कवटकर, आयुष मांजरेकर, साहिल बागवे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी मुलांनी सातत्याने प्रयत्न करून कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे सांगितले. शिक्षिका मिताली मोंडकर तसेच विद्यार्थिनी श्रेया करंगुटकर व वेद कुबल यांनी मनोगत व्यक्त केले. मुलांचे प्रोत्साहन वाढविण्याच्या दृष्टीने विविध देणगीदाराने दिलेल्या शिष्यवृत्तीचे वाटप तसेच सन २०१६-१७ च्या दहावीच्या बॅच कडून दिले गेलेले शैक्षणिक साहित्य यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रवीण कुबल यांनी केले. सूत्रसंचालन नंदकिशोर डगरे यांनी केले. श्रीनाथ फणसेकर यांनी आभार मानले.