-संस्थांच्या सहकार्यातून गुणवत्तेला प्रोत्साहन
- rat४p१९.jpg
P२५N७५२२५
सावरी : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना मान्यवर.
संस्थांच्या सहकार्यातून गुणवत्तेला बळ
शर्मिला गोठल ः सावरी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः विविध चॅरिटेबल संस्थांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वितरित केले जात आहे. त्यामुळे गुणवत्तेला प्रोत्साहन मिळते आणि अनेक कुटुंबांची शिक्षणावरील खर्चाची बचत होते, असे सावरी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शर्मिला गोठल यांनी सांगितले.
आदर्श शाळा सावरी नं. १ मध्ये झालेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हे वाटप क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. राजेंद्र पवार, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल दळवी व तालुकाध्यक्ष शैलेश घोसाळकर यांच्या पुढाकाराने सुरू आहे.
कार्यक्रमावेळी सावरी पंचक्रोशीतील घुमरी, भागडेवाडी, तेलेवाडी, सावरी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, परीक्षा पॅड, कंपास बॉक्स, पेन-पेन्सिल असे देण्यात आले. या वेळी ‘सकाळ’चे बातमीदार सचिन माळी यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मंजिरी खोपकर, सदस्य दिनेश पवार, रूपेश सावंत, विशाखा पवार, दिक्षा पवार, पालक अनिता पवार, मुख्याध्यापक संजय घागरूम, मुकुंद फुंदे, प्रसन्न देसाई, प्रकाश पवार, शिक्षक सोमनाथ फुंदे, उपशिक्षिका अंजली केंद्रे, पालक उपस्थित होते.
------ बातमीदार - सचिन माळी....२.७.२०२५-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.