सावर्डे-टुडे पान १ साठी, संक्षिप्त

सावर्डे-टुडे पान १ साठी, संक्षिप्त

Published on

आंबवपोंक्षे गावात
रोपांचे वाटप
सावर्डे ः आंबवपोंक्षे (ता. संगमेश्वर) येथील ग्रामपंचायतीतर्फे गावातील रहिवाशांना रोपांचे वाटप करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाकडून ही झाडांची रोपे मिळवण्यात आली. ग्रामपंचायतीचे सरपंच शेखर उकार्डे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रत्येक घरटी पाच खैराची रोपे देण्यात आली. लागवडीतून भविष्यात चांगले उत्पन्न ग्रामस्थांना मिळावे, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सरपंच शेखर उकार्डे यांनी संगितले. वाटपाप्रसंगी सदस्या प्रिया सुवरे, संदेश पोंक्षे, सुप्रिया सुतार, दामिनी विभूते, पूर्वा भुवड, संतोष भुवड आदी उपस्थित होते.
---------
सावर्डे महाविद्यालयात
करिअर संसदेची स्थापना
सावर्डे ः सावर्डे महाविद्यालयात करिअर संसदेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्रातर्फे सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत ही संसद निवडण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्रिपदी स्नेहल खोपे, सामान्य प्रशासनमंत्री शौनक बोरगावकर, माहिती व प्रसारण मंत्री सानिया कदम, उद्योजकता विकासमंत्री रिया सावर्डेकर, रोजगार स्वयंरोजगार मंत्री सृष्टी पवार, कौशल्य विकासमंत्री यश गुजर, संसदीय कामकाज मंत्री दिक्षा चव्हाण, महिला बालकल्याण मंत्री वैष्णवी घाणेकर, सदस्य सुयोग घाणेकर आदींची निवड करण्यात आली. प्राचार्य टी. वाय. कांबळे यांनी करिअर संसदेची उद्दिष्टे सांगून या माध्यमातून मुलांच्यामध्ये संवादकौशल्य व नेतृत्वगुण वाढीस लागण्यास मदत होणार आहे.
-------

रोटरॅक्ट क्लबतर्फे
डॉक्टरांना रोपांचे वाटप
चिपळूण ः खेड तालुक्यातील लोटे येथील रोटरॅक्ट क्लबच्यावतीने डॉक्टरदिनाचे औचित्य साधून परिसरातील डॉक्टरांबद्दल समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टरांचा समाजातील सहभाग, त्याग आणि सेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉक्टरांची उपस्थिती हीच उपचारांची सुरवात असते, या विचारातून डॉक्टरांच्या माणुसकीच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना झाडाचे एक रोपटे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी क्लबचे अध्यक्ष शुभम काते, रत्नागिरी झोनचे अध्यक्ष तुषार खताते, शुभम सागवेकर, मनीष वाडकर, विक्रम पवार आणि किरण ठसाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com