मूकबधिर विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे
-rat३p३६.jpg-
P२५N७५११३
रत्नागिरी : के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या वर्धापनदिनी शालेय साहित्य वितरण करताना संस्थेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप परूळेकर. सोबत दीपक आंबवले, गजानन रजपूत, अॅड. सुमिता भावे, दाक्षायणी बोपर्डीकर आदी.
---
मूकबधिर विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे
दीपक आंबवले ः अभ्यंकर विद्यालयाचा ४४वा वर्धापनदिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : रत्नागिरी जिल्ह्यातील मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालय उभे राहिले. १९८१ ला या दी न्यु एज्युकेशन सोसायटीने दिव्यांगांना घडवणारी ही शाळा उभी केली. आज शाळेचे विद्यार्थी कला, कौशल्यांमध्ये पारंगत होऊन चांगले काम करत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे निरीक्षक दीपक आंबवले यांनी केले.
मूकबधिर विद्यालयाच्या ४४व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी दी न्यु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. प्रदीप तथा बाबा परूळेकर, कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी दाक्षायणी बोपर्डीकर, व्यवस्थापक राजाराम पानगले, मुख्याध्यापक गजानन रजपूत, पालक प्रतिनिधी उषा सुर्वे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.