व्यवसायामध्ये बेईमानी थोडे दिवसच टिकते
-rat३p१९.jpg -
२५N७४९८७
पावस ः गोळपकट्टा कार्यक्रमात प्रभाकर एकल यांची मुलाखत घेताना अविनाश काळे.
-------
व्यवसायात इमानदारी कायम टिकते
प्रभाकर एकल : नोकरी सोडून कापडविक्रीचा व्यवसाय
गोळप कट्टा---लोगो
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ४ः प्रपंचामध्ये अडीअडचणी असताना व कुटुंबाचा भार असताना देखील नोकरी सोडल्यानंतर सुरुवातीला उधारीवर कपडे घेऊन रस्त्यावर विकताना निराश न होता मेहनत घेतली. व्यवसायामध्ये खूप स्पर्धा आहेत; परंतु इमानदार व कष्ट घेतले तर त्याचे फळ मिळते. धंद्यामध्ये बेईमानी थोडे दिवस टिकते, इमानदारी कायम टिकते, असे रत्नागिरीमध्ये रस्त्यावर उभे राहून कपडे विकणारे प्रभाकर एकल यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुक्यातील गोळपकट्टा कार्यक्रमात गेली ३५ वर्षे रत्नागिरीतील रामआळी येथे रस्त्यावर उभे राहून कपडे विक्री करणारे मूळ सातारा जिल्ह्यातील आणि रत्नागिरीत स्थायिक झालेले प्रभाकर एकल यांची अविनाश काळे यांनी मुलाखत घेतली. प्रभाकर यांचे गाव सातारा जिल्ह्यातील मेहमानगड. वडील रत्नागिरीमध्ये शिपाईची नोकरी करत होते. पाच वर्षाचा असताना वडील पंढरपूर वारीला गेले ते परत आलेच नाहीत. मामाने गावाला नेलं. चौथीपर्यंत शिकलो नंतर शिकता आले नाही. नंतर दुकानात नोकरी करत होते; मात्र नोकरी करताना स्वतःचं काहीतरी हवं, अशी इच्छा होती; मात्र परिस्थितीमुळे पत्नीला माहेरी ठेवले होते. १९८९च्या शेवटी नोकरी सोडली. संतोष क्लॉथ स्टोअर यांनी उधारीवर दहा हजारचा माल दिला. त्यावर आज आहे तिथे रामआळीत रस्त्यावर कपडे विकायला लागलो. पैसे जमतील तसे फेडून टाकले. पत्नीला इकडे आणून आईसह आम्ही भाड्याने राहायला लागलो. हळूहळू जम बसायला लागला. पत्नी आणि आई जेवणाचे डबे देऊ लागल्या. त्यानेही संसाराला मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभाकर एकल म्हणाले, कष्ट खूप केले, निराश न होता मेहनत घेतली. रोज बारा ते तेरा तास उभा राहून व्यवसाय करतो. शनिवार, रविवार, दिवाळी, जत्रा या वेळी रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतो. आजोबा ते नातवंडं अशी माझ्याकडे गिऱ्हाईक जोडली गेली आहेत. ग्रामीण भागातील गिऱ्हाईक जास्त असते. आजच्या तरुणांना सांगेन की, कोणत्याही ठिकाणी नोकरीत, व्यवसायात कष्ट करा, चिकाटी ठेवा, निराश होऊ नका. रिकामे राहू नका तर दिवस बदलतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.