नीलेश राणेंच्या भाषणामधून सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा उघड
75302
नीलेश राणेंच्या भाषणामधून
सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा उघड
परशुराम उपरकर; वैद्यकीय महाविद्यालय प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ ः गेली तीन वर्षे राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे. नारायण राणे खासदार, तर नीतेश राणे कॅबिनेटमंत्री आहेत. तरीही जिल्हा रुग्णालय सुधारणेसाठी त्यांना काहीही करता आलेले नाही. आता आमदार नीलेश राणे विधिमंडळात याप्रकरणी प्रश्न मांडून आपल्यासह भाऊ, वडील एकूणच सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणासमोर आणत आहेत, अशी टीका माजी आमदार शिवसेना नेते परशुराम उपरकर यांनी केली.
श्री. उपरकर म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून ते सुरू केले. कोरोना काळ असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात चांगली सेवा दिली जात होती. मात्र, सरकार बदलल्यानंतर तीन वर्षांत फडणवीस-शिंदे सरकारने या महाविद्यालय आणि रुग्णालयाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था केली आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वारंवार आवाज उठवून आंदोलने करत आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ राणे कुटुंबाकडे संपूर्ण जिल्ह्याची सत्ता असतानादेखील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न अधिवेशनात मांडावा लागत असेल, तर पालकमंत्री, खासदार, आमदार असलेल्या राणे कुटुंबाला आणखी कोणते पद हवे, जेणेकरून जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सुटेल.’
----
कितीवेळा आढावा घेतला?
उपरकर म्हणाले, ‘नारायण राणे यांनी ३५ वर्षे राजकारण केले. २० वर्षे ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तरीही ते जिल्हा आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी काहीही करू शकलेले नाहीत. गेल्या तीन वर्षांत ही सर्व मंडळी सत्तेत असताना त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये सुधारणा करण्यासाठी एक बैठकदेखील घेतलेली नाही. शासकीय मेडिकल कॉलेज आमदार नीलेश राणेंच्या मतदारसंघात येते, त्यामुळे खरोखरच नीलेश राणेंना हा प्रश्न सोडवायचा होता, तर त्यांनी त्याठिकाणी किती वेळा आढावा घेतला? त्यासाठी कोणती उपाययोजना केली? हे त्यांनी जाहीर करावे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.