न्यू जेन आयकॉन सन्मान

न्यू जेन आयकॉन सन्मान

Published on

-rat४p२४.jpg-
२५N७५२४५
रत्नागिरी : रत्नागिरीचे उद्योजक गौरांग आगाशे यांना न्यु जेन आयकॉन म्हणून सन्मानित करताना मान्यवर.
-----
उद्योजक गौरांग आगाशे यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : टॅली एमएसएमई सन्मान पुरस्कार २०२५ मध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक गौरांग आगाशे यांना न्यु जेन आयकॉन म्हणून सन्मानित आले. त्यांना अनबॉक्स युवर डिझायर या रत्नागिरीमधील फूड डिलिव्हरी व्यवसायाकरिता हा सन्मान देण्यात आला. या पुरस्काराबद्दल रत्नागिरीतील उद्योगक्षेत्रातून आगाशे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी पाचवा टॅली एमएसएमई पुरस्कार समारंभ मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे झाला. रत्नागिरीमधील टॅली थ्री-स्टार सर्टिफाईड पार्टनर होरायझन टेक्नॉलॉजीज यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्यांमधून उद्योजकांना त्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी सुचवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com