२१०० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
-rat४p२६.jpg-
२५N७५२६३
रत्नागिरी : फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे आयोजित आरोग्य शिबिरासाठी पुण्यातील नामांकित रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स.
----
फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे
विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने गोळप, शिवारआंबेरे, उमरे, कुरतडे, रनपार, धोपटवाडी, वायंगणी, पावस येथील १३ शाळांमधील २१०० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
शिबिराची सुरुवात झाली असून, यामध्ये विद्यार्थ्यांची नेत्र, दंत, कान, नाक, घसा आणि सर्वसाधारण तपासणी केली जात आहे. यासाठी पुण्यातून श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, सिंहगड डेंटल कॉलेज, सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि देशपांडे दंत क्लिनिक रत्नागिरीमधील डॉक्टर उपस्थित होते.
मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका रितू छाब्रिया यांनी सांगितले की, आपल्याकडे अनेक रुग्णालये असली तरी तांत्रिकदृष्ट्या प्रगत व शहरी पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल व आरोग्यसेवा आणि शिक्षणसंस्थांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर आमचे लक्ष आहे. याचाच एक भाग म्हणून, २०१० मध्ये श्री लक्ष्मीकेशव स्कूलमधून झाली आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्यावतीने दरवर्षी दोनवेळा शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते.
शिबिरात रत्नागिरी आणि पुण्याच्या रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टर्सनी तपासणी केली. विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास पुढील उपचार पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये मोफत आणि अल्पदरात केले जातात. या उपक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा मिळवण्याची एक मोठी संधी उपलब्ध होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.