सेंट थॉमस स्कूलचे घवघवीत यश

सेंट थॉमस स्कूलचे घवघवीत यश

Published on

-rat४p२५.jpg-
२५N७५२४९
रत्नागिरी : सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत यश मिळवणारा सेंट थॉमस स्कूलचा संघ.
------------
‘सुब्रतो’ स्पर्धेत सेंट थॉमस स्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : डेरवण येथे घेण्यात आलेल्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस शाळेने घवघवीत यश संपादन केले. या शाळेतील १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने तसेच मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर अजिंक्यपद पटकावले. १५ वर्षाखालील मुलांच्या संघानेदेखील जिल्हास्तरावर अजिंक्यपद पटकावले आहे.
मुलांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस, शाळेचे मुख्याध्यापक फादर जॉर्ज, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक अजित तसेच स्वप्नाली पवार यांचे देखील कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com