कोळकेवाडीतील ४९ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट

कोळकेवाडीतील ४९ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट

Published on

-ratchl४३.jpg-
२५N७५२९२
पेढांबे ः विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी सरपंच, संस्था पदाधिकारी.
-------
कोळकेवाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीट
चिपळूण, ता. ४ ः तालुक्यातील कोळकेवाडी परिसरातील दुर्गम भागातील गरजू, गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्पिंग हँड्स, मुंबई’ या संस्थेच्यावतीने शैक्षणिक कीट वाटप उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या पेढांबे भराडीवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ४८ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
हेल्पिंग हँड्सचे प्रमुख संतोष ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व देवराव शिसोदे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. याशिवाय स्वच्छतेसाठी साबण, टूथब्रश, टूथपेस्ट आणि नेलकटर साहित्यदेखील देण्यात आले. या उपक्रमात पेढांबे गावच्या नवनिर्वाचित सरपंच विजया पेढांबकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षणप्रेमी व पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com