-जवाहरचौक रस्त्यावर पेविंग ब्लॉक बसविण्यास विरोध
-rat४p१६.jpg-
P२५N७५२२१
राजापूर ः मुख्य रस्त्यासह अन्य विकासकामांसंबंधी बोलताना माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे.
----
जवाहर चौकातील ‘पेवर ब्लॉक’ला विरोध
काँग्रेस-शिवसेना आघाडीची भूमिका; प्रशासन धारेवर, पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती का नाही?
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ : जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी सातत्याने खड्डे पडत असल्याने हे खड्डे भरण्यासह रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी का करण्यात आली नाही? विकासकामाला विरोध नाही; मात्र सातत्याने पाण्याचा साठा होत असलेल्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवल्यास ते त्या ठिकाणी टिकणार नाहीत. डांबरी, काँक्रिट, डांबरी आणि आता पेवर ब्लॉक हा खेळ नेमका कशासाठी आणि कोणासाठी? प्रशासन हा रस्ता ठेकेदारासाठी करतेय की लोकांसाठी, असा हल्लाबोल माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी केला.
काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक बसवण्यास विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली. याबाबत काँग्रेस-शिवसेना आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पालिकेमध्ये भेट घेतली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, नगरपालिकेतील माजी विरोधी गटनेते विनय गुरव, माजी नगराध्यक्षा कल्याणी रहाटे, माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर आदी उपस्थित होते. सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च झालेला जकातनाका ते जवाहरचौक हा मुख्य रस्ता पहिल्या वर्षापासून वाहतो आहे. मुख्य रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत असून, त्याची पावसाळ्यापूर्वी डागडुजी का केलेली नाही? काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण आणि आता पेवर ब्लॉक बसवण्यात येत असल्याचे समजते. सातत्याने वर्दळ असलेल्या या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू करण्यापूर्वी आठ दिवस रस्ता जेसीबीच्या साह्याने खोदून ठेवल्याने सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा जाब मुख्याधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी विचारला.
---
चौकट ः
पुन्हा सात लाखांचे अंदाजपत्रक
जवाहरचौक ते जकातनाका या मुख्य रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तिथे पालिकेच्या फंडातून पेवर ब्लॉक बसवण्यात येणार असल्याची माहिती नगर पालिका प्रशासनाने दिली. या कामाचे सुमारे सात लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनवण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.